• Fri. Jul 17th, 2026
    Lakhpati Didi Yojana: ‘लखपती दीदीं’ना 50 हजार कोटींचे कर्ज; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

    Lakhpati Didi Yojana: ‘एम्पॉवरिंग रूरल महाराष्ट्र : नाबार्ड’ या पुस्तिकेचे प्रकाशन; तसेच चंद्रपूर जिल्ह्यात महिलांच्या नेतृत्वाखाली ‘नाबार्ड’च्या साह्याने राबविण्यात आलेल्या ‘बॅकयार्ड पोल्ट्री लाइव्हलीहूड’ प्रकल्पावरील माहितीपटाचे प्रदर्शन करण्यात आले.

    दत्तात्रय भरणे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे: महिला या शेतीच्या कणा आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि उमेद अभियान या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण होत आहे. राज्यातील ५० लाखांहून अधिक महिला स्वयं-सहायता गटांतील सदस्यांना ५० हजार कोटींपेक्षा अधिक कर्जवाटप करून त्यांना ‘लखपती दीदी’ घडवण्याचे काम सुरू आहे, असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गुरुवारी सांगितले.

    राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालयाच्या ४५ व्या स्थापना दिन कार्यक्रमात ते बोलत होते. पुणे इंटरनॅशनल सेंटरमध्ये (पीआयसी) झालेल्या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्यस्तरीय बँकर्स समितीचे महाव्यवस्थापक विवेक नचाणे, ‘बायफ विकास संशोधन संस्थे’चे अध्यक्ष डॉ. भरत काकडे, ‘महाराष्ट्र राज्य सहकारी बँक’चे प्रशासक विद्याधर अनास्कर, ‘नाबार्ड’चे मुख्य महाव्यवस्थापक प्राचार्य जयकिश, महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयाचे मुख्य महाव्यवस्थापक डॉ. ए. व्ही. भवानी शंकर उपस्थित होते.

    Maharashtra TimesRamraksha Vs Hanuman Chalisa: रामरक्षा विरुद्ध हनुमान चालीसा; विदर्भात 18 जुलैला ठाकरे-राणा आमनेसामने
    विकसित महाराष्ट्र २०४७ या अंतर्गत २०३० पर्यंत एक ट्रिलियन डॉलर आणि २०४७ पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था उभारण्याचे लक्ष्य ग्रामीण भाग, शेती आणि सहकार क्षेत्राच्या बळावरच साध्य होईल. राज्यातील शेतकरी व सहकार क्षेत्राच्या विकासासाठी गेल्या ४५ वर्षांपासून नाबार्डने मोठे योगदान दिले आहे,’ असे भरणे यांनी सांगितले. ‘नाबार्डने उमेद आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांना सहकार्य करावे,’ असे आवाहन त्यांनी केले.

    ‘२०२५-२६ या वर्षांत कर्ज रक्कम ३९ हजार ३८० कोटींवर पोहोचली आहे. महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण आणि ग्रामीण संस्थांचे बळकटीकरण हे नाबार्डचे धोरण आहे,’ असे डॉ. भवानी शंकर यांनी सांगितले. स्मृती भगत यांनी स्वागत केले. अविनाश सेवलकर यांनी आभार मानले.

    Maharashtra TimesDevendra Fadnavis Eknath Shinde: दिल्लीत जाणार का, मुख्यमंत्री होणार का? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर प्रश्नांचा भडिमार
    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत दोन लाखांपर्यंत कर्जमाफी व नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार रुपये प्रोत्साहन, कृषी पंपांसाठी मोफत वीज, नैसर्गिक शेती अभियान, एक कोटीहून अधिक शेतकऱ्यांना डिजिटल ओळख या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम केले जात आहे. –दत्तात्रय भरणे, कृषिमंत्री

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा