Devendra Fadnavis Eknath Shinde: मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला जाणार का आणि राज्याला नवा मुख्यमंत्री मिळणार का अशा चर्चांना उधाण आले आहे.
मात्र या दोन्ही नेत्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना शांतपणे व हजरजबाबीपणे उत्तरे दिली आहेत. एनडीएमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेचे वजन वाढले असून त्यांना यावेळी विस्तारात कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असल्याचे खात्रीलायकरित्या समजते. केंद्रातील विस्तारामध्ये मुख्यमंत्र्यांचाही समावेश होणार असल्याच्याही वावड्या उठवल्या जात आहेत. फडणवीस यांना दिल्लीत पाठवून त्यांच्यावर अर्थखात्याची जबाबदारी देणार असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. दुसरीकडे फडणवीस दिल्लीत गेल्यास राज्यात मुख्यमंत्रिपदाची माळ एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पडणार असल्याचीही जोरदार चर्चा आहे. यात कितपत तथ्य आहे हे वेळ आल्यावर समजणार असले तरीही प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मात्र या दोन्ही नेत्यांना याविषयी प्रश्न विचारून त्यांची कशी राजकीय कोंडी करता येईल याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत.
Mumbai News : ‘CM देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांच्या सुखदुःखात पाठीशी उभे असणारे एकमेव नेतृत्व’; भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचं प्रतिपादन
‘मी कालच दिल्लीला जाऊन आलो …’
प्रसारमाध्यमांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गाठून त्यांच्याकडून दिल्लीवारीचे कारण जाणून घेतानाच, ‘तुम्ही दिल्लीला जाणार का’, असा थेट प्रश्न विचारला. त्यावेळी फडणवीसांनी चेहऱ्यावरचे स्मितहास्य जराही ढळू न देता, ‘मी कालच दिल्लीला जाऊन आलो’, असे उत्तर दिले.
Tukaram Mundhe Action : मुंबईत दुधाच्या पिशव्यांमध्ये छेडछाड, तुकाराम मुंढेंनी आरोपींच्या नांग्या ठेचल्या
‘मुख्यमंत्रिपदाची व्हॅकन्सी आहे का?’
फडणवीसांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न फसल्यानंतर माध्यमांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गाठले. ‘तुम्ही मुख्यमंत्री होणार का’, असा प्रश्न अलगद केला. यावर, ‘मुख्यमंत्रिपदाची व्हॅकन्सी आहे का सध्या’, असे त्यांनी विचारताच उपस्थितांमध्ये खसखस पिकली.
Ganeshotsav 2026: ‘पीओपी’ला विरोधच! नैसर्गिक जलप्रवाहांत विसर्जन नको; याचिकाकर्त्यांची भूमिका
जयंत पाटील-शिंदे भेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानी पाटील यांनी त्यांची भेट घेतली. दोघांमध्ये साधारण तासभर चर्चा झाली, परंतु त्याचा तपशील मिळू शकलेला नाही. सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी ईश्वरपूरच्या नगराध्यक्षांवर अपात्रतेची कारवाई केली आहे. चुकीच्या पद्धतीने झालेल्या या कारवाईबद्दल आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती, असा खुलासा पाटील यांनी केला. याशिवाय या प्रश्नावर नगरविकास खाते असलेल्या एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे ाटील यांनी सांगितले होते. त्यानुसार ही भेट झाल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी शप पक्ष भाजपसोबत जाण्याच्या तयारीत असून राज्य सरकारमध्ये या पक्षाला वित्त आणि नियोजन खाते दिले जाणार असल्याची चर्चा आहे. पाटील हे वित्त खात्याचे दावेदार मानले जातात. मात्र, त्यास शिवसेनेचा विरोध असल्याचे कळते. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी शिंदेंची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जात आहे.
देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेल्यास, महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? कृपया तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये शेअर करा.
