• Wed. Jul 15th, 2026

    Car Accident: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात क्रेटा कारचा चुराडा; एकाच कुटुंबातील 4 जणांचा जागीच मृत्यू!

    Car Accident: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात क्रेटा कारचा चुराडा; एकाच कुटुंबातील 4 जणांचा जागीच मृत्यू!

    प्रसाद रानडे, रत्नागिरी: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अलीकडे अपघातांचे प्रमाण कमी झाल्याची चर्चा असतानाच आज पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. महामार्गावर उभ्या करण्यात आलेल्या अवजड वाहनामुळे हा अपघात झाला असून या अपघातात तब्बल चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसंच दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी लांजा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. अपघातात दोन महिला आणि एका पुरुषासह एकूण चार जणांचा मृत्यू झाला आहे. धडकेची तीव्रता इतकी भीषण की कारचा अक्षरशः चुराडा झाला.

    मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावर असलेल्या लांजा शहरातील शांतीनगर येथील रेस्टहाऊसजवळ हा भीषण अपघात झाला आहे. गोव्याहून मुंबईकडे येणाऱ्या क्रेटा कार क्रमांक (MH 01 CP 8021) या कारची धडक महामार्गावर उभ्या असलेल्या डंपरला (MH 05 EL 3877) पाठीमागून धडक बसल्याने हा भीषण अपघात झाला आहे. महामार्गावर उभी करण्यात येत असलेली ही मोठी वाहने अनेक कुटुंबांसाठी जीवघेणी ठरत आहेत.

    दीड महिन्यांपूर्वी रायगड जिल्ह्यात पोलादपूर येथे झालेल्या भीषण अपघातात दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठातील सहाय्यक कुलसचिव अनिल मरकड यांच्यासह कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला होता. या अपघाताला दोन महिने होत नाही तोच पुन्हा एकदा अशाच स्वरूपाचा अपघात लांजा येथे झाल्याने महामार्गावर उभ्या राहत मोठ्या वाहनांवर काही नियम व निर्बंध घालण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे.

    भीषण अपघातात मृतांची प्राथमिक ओळख पडली असून नावे पुढीलप्रमाणे असल्याची माहिती लांजा पोलिसांनी दिली आहे.
    1) यास्मिन इरफान कुरेशी वय 54 वर्ष
    2) पिझ्झा अनस कुरेशी व 27 वर्ष,
    3) महम्मद इरफान कुरेशी वय 15 वर्षे
    तिन्ही राहणार पटेल अपार्टमेंट सी एच एस लिमिटेड एफ/नं./डी/1601, 233/234, बेलासिस रोड एम ए रोड नागपाडा जंक्शन मुंबई पिन कोड क्रमांक 400008
    4) मुस्तफा अल्फाज काफी वय 24 वर्ष

    जखमीचे नाव

    1) अनस इरफान कुरेशी (वय 31 वर्षे, राहणार पटेल अपार्टमेंट सी एच एस लिमिटेड एफ/नं./डी/1601, 233/234, बेलासिस रोड एम ए रोड नागपाडा जंक्शन मुंबई पिन कोड क्रमांक 400008)

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed