Nashik Eco Accident : राज्यात दिवसेंदिवस अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच नाशिकमधील पेठ महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे.
नाशिक अपघात चौघांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जयेश साबळे, नाशिक : नाशिक पेठ महामार्गावर असलेल्या सावळघाट येथे काल मंगळवारी रोजी सायंकाळच्या सुमारास झालेल्या विचित्र अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून, एक जण या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. सावळघाटात एका इको कारवर मागून आलेली ट्रॅक धडकली आणि पुढे असलेल्या ट्रॅक आणि मागून धडकलेल्या ट्रक यांच्यामध्ये ही इको कार दाबली गेली. या इको कारमध्ये बसलेल्या चार जणांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.
नेमका अपघात कसा झाला?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मारुती ओमनी इको क्र. GJ 15 CR 5659 ही गाडी नाशिकहून पेठच्या दिशेने जात होती. याचवेळी सावळाघाट येथे तीव्र उतारावर पाठीमागून येणाऱ्या ट्रक क्र. MH 04 GF 8901चे ब्रेक फेल झाले. त्यामुळे ही या ट्रकवरील वाहनचालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही ट्रक इको कारवर जाऊन धडकली आणि पुढे असलेल्या ट्रक क्र. NL 01 AC 1929 यांच्यामध्ये ही इको कार दाबली गेली. या अपघात इको कारचा अक्षरशः चक्काचूर झाला होता. Kashigaon Metro Station: मेट्रोला दुसरा प्रवेशमार्ग! काशिगावच्या प्रवाशांना दिलासा; अतिरिक्त तिकीट स्कॅनिंग सुविधेमुळे गर्दीवर नियंत्रण
उपचारादरम्यान एकाचा मृत्यू
इको कारमध्ये बसलेल्या दोन पुरुष आणि एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेत गंभीर जखमी असलेल्या दोघा जणांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान एकाच मृत्यू झाला. त्यामुळे या घटनेत एकूण चौघांचा मृत्यू झाला. अपघातात मयत पावलेल्या आणि जखमी यांची ओळख अद्याप पटलेली नसून ओळख पटविण्याचं काम सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच पेठ आणि दिंडोरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले होते. तातडीने घटनेचा पंचनामा करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. TET Paper Leak : TET पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट; प्रत्येक पेपरमागे मुख्य सुत्रधाराला किती रुपये? थेट छापखान्यातील कर्मचाऱ्यांशी संपर्क
भीषण अपघात चौघांचा मृत्यू दोन जखमी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अलीकडे अपघातांचं प्रमाण काहीसं कमी झालं असलं तरी आज बुधवारी रोजी पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. महामार्गावर उभे करण्यात येत असलेल्या मोठी मालवाहू कंटेनर यांच्यामुळेच हे भीषण अपघात घडत आहेत. या अपघातात तब्बल चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्या सगळ्यांना लांजा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. अपघातात दोन महिला आणि दोन पुरुषासह एकूण चार जणांचा मृत्यू झाला आहे. धडकेची तीव्रता इतकी भीषण की कारचा अक्षरशः चुराडा झाला.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा