• Wed. Jul 15th, 2026

    एसी लोकल दररोज विलंबाने, जादा भाडं भरूनही प्रवाशांचे हाल; तिकीटाच्या एका तासाच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह

    एसी लोकल दररोज विलंबाने, जादा भाडं भरूनही प्रवाशांचे हाल; तिकीटाच्या एका तासाच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह

    म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकल फेऱ्या रोज सरासरी १५ मिनिटे विलंबाने धावत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी वाढत आहे. विशेषतः रात्रीच्या एसी लोकलचा विलंब अधिक असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. यामुळे एसी लोकलच्या तिकिटावरील एका तासाच्या वैधतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तिकीट वैधता संपल्याने नुकतेच एका प्रवाशाने ५०० रुपयांचा दंड भरला आहे.

    अधिक भाडं भरूनही बसायला जागा नाही

    एसी लोकलमध्ये अनेकदा तिकीट तपासणी कर्मचारी नसतात. त्यामुळे विनातिकीट प्रवासी तसेच द्वितीय व प्रथम श्रेणीचे तिकीट किंवा पासधारकही एसी डब्यांमध्ये चढत असल्याने मोठी गर्दी होते. अधिक भाडे भरूनही एसी लोकलमध्ये बसायला जागा मिळत नाही. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत डब्यात प्रवेशही करता येत नाही, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.

    ST Bus: एसटी प्रवाशांना दिलासा नाहीच, महामंडळाकडून पुन्हा १३.५०% भाडेवाढीचा प्रस्ताव; पाच रुपयांच्या पटीत तिकीटं

    एसी लोकलचे तिकीट काढल्यानंतर एका तासाच्या आत प्रवास करणे आवश्यक असल्याचे तिकिटावर नमूद असते. ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही तिकिटांसाठी हाच नियम आहे. मात्र, लोकलच विलंबाने धावत असेल आणि त्या दरम्यान तिकिटाची वैधता संपली, तर अशा प्रवाशांवर कारवाई होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. रेल्वे प्रशासनाने याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.

    ११ जून रोजी कल्याण स्थानकात एका व्यक्तीने आपल्या नातेवाइकांना निरोप देण्यासाठी फलाट तिकीट काढले होते. संबंधित लांब पल्ल्याची रेल्वे दुपारी १२ वाजता येणे अपेक्षित होती. मात्र, ती तब्बल पाच तास उशिराने अर्थात सायंकाळी ५ वाजता कल्याण स्थानकावर पोहोचली. फलाट तिकीटाची वैधता केवळ दोन तासांची असल्याने त्या व्यक्तीवर तिकीट तपासनीसांनी ५०० रुपयांचा दंड आकारला. त्याने विनंती केली माझ्याकडे तिकीट आहे, एक्स्प्रेस विलंबाने आल्याने मी फलाटावर थांबलो. मात्र, टीसीने त्याच्याकडून ५०० रुपये वसूल केले. अशीच परिस्थिती एसी लोकलच्या तिकीटाबाबत उद्भवल्यास प्रवाशांनाही दंड भरावा लागणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

    लोकल फेऱ्या वाढवा

    ‘आम्हाला एसी लोकलची गरज नाही. गर्दी आणि अपघातांवर नियंत्रण ठेवायचे असेल, तर लोकलच्या फेऱ्या वाढविणे आवश्यक आहे,’ असे कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी सांगितले.

    Maharashtra TimesWeather Alert: महाराष्ट्रावर ढग परतले, वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडणार, मुंबईसह ६ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

    “मी रोज एसी लोकलने प्रवास लोकल मिळेल या अपेक्षेने जास्त भाडे भरतो, पण गाडी उशिरा येते. तिकीटाची वैधता संपली तर आमच्यावर कारवाई होईल का, याची भीती कायम असते. रेल्वेने विलंबाच्या परिस्थितीत प्रवाशांना स्पष्ट सवलतीचा नियम जाहीर करावा,” स्मिता पाटील, प्रवासी

    गेल्या काही दिवसांपासून एसी लोकलच्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. मध्येच लोकलमधला एसी बंद पडल्याने प्रवाशांचा श्वास कोंडला आणि तिघांना चक्कर आली. मध्य रेल्वेने प्रवास सुखद होण्यासाठी काय उपाययोजना केल्या पहिजेत? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed