Thane-Ghodbunder Gaimukh Ghat Traffic : मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे-घोडबंदर रोडवरील गायमुख घाटातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरल्यामुळे ते काम आता हाती घेण्यात आलं आहे. त्यामुळे काही मार्गांची वाहतूक बंद असणार आहे.
मिरा भाईंदर वाहतूक अपटेड गायमूख घाट बंद(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
भाविक पाटील, मिरा-भाईंदर : ठाणे-घोडबंदर रोडवरील गायमुख घाटातील रस्त्याच्या दुरूस्तीचे काम आज शनिवारी सकाळपासून हाती घेण्यात आलं असून ते उद्या रविवारी रात्रीपर्यंत सुरू राहणार आहे. यादरम्यान दोन्ही बाजूने वाहतूक सुरू राहणार असली तरी, काही मार्ग बंद ठेवले जाणार आहेत. परिणामी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने ते टाळण्यासाठी दोन दिवस पर्यायी मार्गाने वाहतूक करण्याचं आवाहन काशिमिरा वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
खड्डे पडल्यामुळे संथ गतीने वाहतूक
ठाणे-घोडबंदर रोडवरील गायमुख घाटातील रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्याची अक्षरश चाळण झाली आहे. आधीच हा रस्ता अरुंद असताना त्यावर खड्डे पडल्यामुळे संथ गतीने वाहतूक होत आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक कोंडीच्या समस्येत अधिक भर पडली आहे. रस्त्यावरील खड्डे आणि रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे दीड ते दोन तास होऊन अधिक काळ या कोंडीत अडकून पडावे लागत असल्यानं वाहन चालक त्रस्त झाले आहेत. Parth Pawar : पार्थ पवारांचा साखरपुडा ठरला, काश्मिरची कन्या होणार पवारांची सूनबाई, कोण आहे कायनात धार?
दोन्ही मार्गिकावरील वाहतूकही सुरू
या पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदर महापालिका प्रशासनाकडून आज शनिवारी सकाळी नऊ वाजल्यापासून हे काम हाती घेण्यात आलं आहे. हे काम उद्या रविवारी रात्री 12 वाजेपर्यंत केलं जाणार आहे. हे काम करत असताना दोन्ही मार्गिकावरील वाहतूकही सुरू राहणार आहे. मात्र, घोडबंदरहून येणाऱ्या वाहनांना मिरा-भाईंदर चेना येथून विरुद्ध दिशेने मिरा-भाईंदरकडे सोडले जाणार आहे. तर, ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवरील वाहतूक येणाऱ्या मार्गिकेवरील विविध टप्प्यातील वाहतूक थांबून सुरू ठेवली जाणार आहे. Chhatrapati Sambhajinagar : 90च्या दशकात शहरात मोठी दहशत, महिनाभरापूर्वी मृत्यू, छ.संभाजीनगरमधील ‘बाबा’ डॉनच्या घरी छापा; मोठं घबाड सापडलं
काशिमिरा वाहतूक पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन
यावेळी अवजड वाहनांची देखील वाहतूक सुरू होणार असल्यानं रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून, पर्यायी रस्त्यांचा म्हणजे पालघरकडून ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनांना शिरसाट फाटा पासून गणेशपुरी आणि चिंचोटी खरबाव मार्गे, गुजरातहून येणाऱ्या वाहनांना मनोर येथून वाडा नाकामार्गे, तर ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेला जाणाऱ्या वाहनांना वाय जंक्शन येथून सरळ नाशिक रोडने मानकोली मार्गे जाण्याचं आवाहन काशिमिरा वाहतूक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल वाघ यांच्याकडून करण्यात आलं आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा