Breakup prompted to expose MPSC exam paper leak : गर्लफ्रेण्डसाठी काहीतरी करायला पाहिजे, या भावनेने प्रियकराने एमपीएससीच्या अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करत औषध निरीक्षकपदाच्या परीक्षेचे काही प्रश्न तिला मिळवून दिले. त्यामुळे प्रेयसी परीक्षेत सातवी आली, औषध निरीक्षक झाली आणि तिने लगेच ब्रेकअपही केलं. प्रेमभंग झाल्यामुळे चिडलेल्या प्रियकराने पोलिसांना याची टिप देऊन पर्दाफाश केला.
तरुणाची एमपीएससीला गुप्त माहिती
अन्न आणि औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब, अन्न व औषध प्रशासन या संवर्गाची चाळणी परीक्षा २२ मार्च २०२६ रोजी ‘एमपीएससी’मार्फत घेण्यात आली. मात्र, परीक्षा होण्यापूर्वी काही दिवस आधी तज्ज्ञांनी तयार केलेल्या प्रश्नसंचातून काही प्रश्न प्राप्त करून, त्याचा वेगळा प्रश्नसंच तयार करून तो पुढे इतर व्यक्तींना देण्यात आला, अशी माहिती लोकेश उर्फ गौरव पाटील या तरुणाने ‘एमपीएससी’ला दिली. या माहितीमधील तथ्य पडताळण्यासाठी याबाबतचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे देण्यात आला.
परीक्षा प्रक्रियेतील गोपनीयतेचा भंग
पोलिस उपायुक्त राज तिलक रौशन यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कक्षाचे मंगेश देसाई यांचे विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने गौरव याला ताब्यात घेऊन प्राथमिक चौकशी केली. यामध्ये गौरव याने सांगितलेली माहिती पडताळण्यात आली. प्राथमिक चौकशीमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा प्रक्रियेतील गोपनीयतेचा भंग करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
Tukaram Mundhe : पाच मित्र रेस्टॉरंटमध्ये बसले, वेटरला एकच प्रश्न विचारला, तोच तुकाराम मुंढेंचं दर्शन घडलं, व्हिडिओला नेटिझन्सची पसंती
प्रेमभंग झाला आणि धागेदोरे उलगडले
आरोपींपैकी एक असलेला, पेपरफुटीची माहिती देणारा लोकेश उर्फ गौरव पाटील आणि एका तरुणीचे प्रेमसंबंध होते. ही तरुणी औषध निरीक्षकपदाच्या परीक्षेला बसली होती. तिच्यासाठी आपण काही तरी केले पाहिजे, असा विचार करून गौरवने योजना आखली. प्रवीण पाटील याच्यामार्फत एमपीएससीच्या अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून त्याने काही प्रश्न मिळवून तरुणीला दिले. तरुणी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. यामुळे तिच्यासोबत आपली जवळीक अधिक वाढेल, असे गौरव याला वाटले होते. औषध निरीक्षक होताच तरुणीने प्रेमसंबंध तोडले. त्यामुळे संतापलेल्या गौरव याने स्वतःच याबाबत एमपीएससीला माहिती दिली.
कफ परेड पोलिस ठाण्यात गुन्हा
परीक्षेपूर्वीच पेपर फुटल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेच्या वतीने या प्रकरणात महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) अधिनियम, २०२४, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम; तसेच भारतीय न्याय संहितेच्या वेगवेगळ्या कलमान्वये कफ परेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मोबाइल फोन, त्यावरून साधलेला संवाद, पैशांचे व्यवहार; तसेच इतर तांत्रिक पुरावे आणि संशयितांच्या केलेल्या चौकशीमध्ये एमपीएससीच्या अधिकाऱ्यांचा सहभाग आढळला.
Red Suitcase Murder : विवाहित प्रियकराने पत्नीच्या मदतीने प्रेयसीला संपवलं, लाल ट्रॉलीत 18 तुकडे भरले, 20 दिवसांनी गूढ उलगडलंकाही दिवसांपूर्वी शेतकरी नेते रवीकांत तुपकर यांनी इन्स्टाग्रामवरुन यासंबंधी माहिती शेअर करताना आरोपी गौरव आणि त्याच्या प्रेयसीचे स्क्रीनशॉटही शेअर केले होते.
पोलिसांनी ‘एमपीएससी’चे सहायक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नकाते, अवर सचिव अभिजित लेंडवे, सहायक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे यांना अटक केली. प्रवीण दिलीप पाटील (संचालक कौटील्य अकादमी, नंदुरबार), अमृत पाटील आणि लोकेश उर्फ गौरव राजेंद्र पाटील यांचाही या गुन्ह्यात सहभाग आढळल्याने त्यांनाही पकडण्यात आले. या सर्व आरोपींना बुधवारी सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दोन सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
