• Sat. Jul 11th, 2026
    Mumbai Mega Block: मुंबईकरांसाठी महत्त्वाचे! रविवारी मध्य अन् हार्बर रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक, कोणत्या लोकल रद्द? पाहा वेळापत्रक

    Central And Harbour Railway Megablock: मुंबईकरांनो, रविवारी लोकलने फिरण्याचा प्लॅन करत असाल, तर आधी वेळापत्रक तपासा. मध्य व हार्बर रेल्वेमार्गावर ब्लॉक. कोणत्या लोकलवर परिणाम?

    मुंबई लोकल ट्रेन अपडेट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान मध्य रेल्वेने उद्या, रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉक वेळेत रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल दुरुस्ती करण्यात येते. यामुळे काही लोकल विलंबाने धावणार असून काही लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही.

    मध्य रेल्वे
    स्थानक- सीएसएमटी ते विद्याविहार
    मार्ग- अप आणि डाउन धीमा
    वेळ- सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५
    परिणाम- ब्लॉक वेळेत अप आणि डाउन धीम्या मार्गावरील लोकल अप आणि डाउन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या सुमारे २० मिनिटे विलंबाने धावणार आहे.

    Maharashtra TimesBus hold for Shev Puri : इच्छा माझी ‘पुरी’ करा! बेस्ट चालकाने शेवपुरीसाठी बस रस्त्यात 20 मिनिटं थांबवली, मुलुंडमध्ये वाहतुकीचे तीनतेरा
    हार्बर रेल्वे
    स्थानक- सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे
    मार्ग- अप आणि डाउन
    वेळ- सकाळी ११.४० ते दुपारी ४.४०
    परिणाम- ब्लॉक वेळेत सीएसएमटी ते वाशी / बेलापूर / पनवेल आणि सीएसएमटी ते वांद्रे / गोरेगावदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाउन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. पनवेल ते कुर्ला दरम्यान २० मिनिटांच्या फरकाने विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

    Maharashtra TimesBEST Bus Accident: बेस्ट बसची ‘धडक’ मोहीम थांबेना! अंधेरीत 14 वाहनांना उडवले; दोन जण जखमी
    मध्य रेल्वेकडून अजूनही दुर्लक्ष
    मध्य रेल्वेवरील उल्हासनगर (फलाट क्र. २) आणि ठाणे (फलाट क्र. ६) येथे छतगळतीची समस्या कायम आहे. त्यातच लोकल गाड्यांना वारंवार होणारा विलंब आणि पाऊस यामुळे प्रवाशांना फलाटावर छत्री उघडून गाडीची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या या समस्येकडे कधी लक्ष देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

    Maharashtra TimesTukaram Mundhe FDA Department : ताटातील अन्नातही भेसळ! 4 हॉटेल्सचे परवाने जागेवर निलंबित, 13 जणांना उचललं, FDAची राज्यात कुठे-कुठे कारवाई?
    लोकलमध्ये मोबाइलचोराला पकडले
    लोकलमधील प्रवाशाचा मोबाइल फोन खेचून धावत्या लोकलमधून उडी टाकून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणाला प्रवाशांनी पकडून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना मंगळवारी दुपारी रबाळे रेल्वेस्थानकात घडली. वाशी रेल्वे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. तक्रारदार आदेश धनावडे (२४) हा तरुण कोपरखैरणे स्थानकातून ठाणे लोकलने निघाला होता. लोकल रबाळे रेल्वेस्थानकातून निघाली असताना, आदेशच्या मागे उभ्या असलेल्या एका तरुणाने त्याच्या हातातील मोबाइल फोन खेचून धावत्या लोकलमधून रबाळे रेल्वेस्थानकात उडी मारली.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा