Prithviraj Chavan on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत आणायचं अशी चर्चा मला खरी वाटत नाही, कारण शेवटी अडचण अशी की तिथे कोणाला नेमायचं, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. याविषयी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही भाष्य केलं आहे. फडणवीसांना केंद्रात पाठवून शिंदे गट भाजपात विलीन करायचा आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद द्यायचं, अशा चर्चा ऐकल्याचं पृथ्वीबाबा म्हणाले.
‘आमदारांची फोडाफोडी ही वैचारिक आहे का?’
बीबीसी मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण यांना फडणवीसांना दिल्लीत संधी मिळण्याच्या चर्चांबद्दल विचारलं असता, ते म्हणाले की, “खासदार-आमदारांची फोडाफोडी ही वैचारिक आहे का? अगदी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना छातीवर हात ठेवून बोलायला सांगा, की ही वैचारिक आहे की त्यामागे काही आर्थिक विषय आहेत. पन्नास खोके वगैरे. पण त्यामुळे आम्हाला लोकसभेमध्ये फायदा मिळाला.”
“सरकार टिकवणं, सरकार आणणं, सरकार फोडणं, आमदार विकत घेणं… लोकसभेत दोन तृतीयांश बहुमत मिळवणं, हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अजेंडा आहे, महाराष्ट्र सरकारचा नाही. जे महाराष्ट्रात घडलं, ते मोदींच्या आशिर्वादाशिवाय घडू शकलं नसतं. याला शंभर टक्के मोदी जबाबदार आहेत, असं होऊ शकेल का, की तुमच्या महत्त्वाच्या, मोठ्या राज्यामध्ये काहीतरी घडतंय, तुम्ही पक्षांतरबंदी कायदा पायदळी तुडवता, तुम्ही आमदारांना गुजरातला नेताय, आसामला नेताय, मोदी काय परदेशी दौऱ्यात व्यस्त होते, म्हणून त्यांना माहिती नाही का? अमित शाह काय करत होते?” असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारला. Uddhav Thackeray : मातोश्रीवर हायव्होल्टेज बैठक, 24 आमदार आले, पण निष्ठावान नेत्याची दांडी चर्चेत, ठाकरेंकडून महत्त्वाच्या सूचना “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हे धोक्याचं आहे, असं मला वाटत नाही, त्यांना ते बदलायचं आहे का, हा त्यांचा विषय आहे. माध्यमांनीच बातम्या दिल्या की दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार, कोण खाली जाणार, कोण बाहेर जाणार, बघू आता काय ते” असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
Sanjay Raut | शरद पवारांनी घेतली शिंदेंची भेट, संजय राऊत चिडले?; नेमकं काय म्हणाले?
फडणवीस दिल्लीत, शिंदे मुख्यमंत्री?
“आमचे सोर्सेस सांगतात की कोण जाणार, कोणाला डच्चू मिळणार, देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत आणायचं अशी चर्चा आहे, पण मला वाटत नाही ते खरं असेल, कारण शेवटी अडचण अशी की तिथे कोणाला नेमायचं, मी या ऐकलेल्या चर्चा आहेत, गप्पा आहेत, मीडिया गॉसिप आहेत, मला कोणीही अधिकृत सांगितलेलं नाही, मी तर असंही ऐकलं की, बहुतेक शिंदेंचा गट भाजपमध्ये विलीन करुन त्यांना महाराष्ट्रात मुख्यमंत्री करतील आणि त्यांच्या चिरंजीवांना कॅबिनेट मंत्रिपद देतील, या चर्चा आहेत, मी ऐकतोय फक्त.” असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. Eknath Khadse : महाजनांचा प्रभाव घटवण्यासाठी केंद्राची नवी चाल? तावडेंशी भेट, घरवापसीच्या चर्चांवर एकनाथ खडसे म्हणतात…
अर्थव्यवस्थेवर टीका
“देशाच्या अर्थव्यवस्थेचं वाटोळं झालं आहे. आज केंद्रीय जीडीपीच्या आकडेवारीवर कोणाचा विश्वास नाही. आकडे फुगवून सांगितले जातात, असं आम्ही नाही तर नोबेल पारितोषिक विजेते अभिजीत बॅनर्जींसारखी माणसं बोलतात, माजी केंद्रीय आर्थिक सल्लागार बोलतात. मोदी प्रत्येक देशात जाऊन तुम्ही मला एक अवॉर्ड द्या, नसलेलं बक्षीस तयार करुन द्या, असं सांगतात. देशाचं हसं झालं आहे. परराष्ट्र धोरणात पाकिस्तान कुठे निघून गेला आहे. चीनने आपली जमीन घेतली नाही, असं मोदी लोकसभेत छातीठोकपणे सांगतात, पण सॅटेलाईट फोटो वेगळंच सांगतात. कसा मुकाबला करणार चीनशी?” असा सवालही पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारला.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा