- लोणावळा येथे ६७० मिमी पावसाची नोंद
मुंबई, दि. ६: राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असून प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी १७ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF आणि) ६ राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) ची पथके सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्र यांनी दिली आहे.
मान्सुन कालावधीकरिता राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF)पथके पुर्व तैनात करताना पालघर व नागपूर येथे प्रत्येकी २ आणि पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली व धाराशिव प्रत्येकी १ पथके मुंबई येथे ४ पथके तैनात करण्यात आली आहेत.तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) ची एकूण ६ सज्ज असून धुळे व नागपूर प्रत्येकी २आणि नांदेड, गडचिरोली पथके तैनात आहेत.
मुंबईतील सांताक्रूझ येथे १५१.२ मिमी तर कुलाबा येथे १२८ मिमी पावसाची नोंद झाली. याशिवाय लोणावळा येथे ६७० मिमी, अंबोना येथे ५३७ मिमी, ताम्हिणी येथे ५८० मिमी, भिवपुरी येथे २६६ मिमी, विभाग येथे ३०५ मिमी, निलशी येथे २७५ मिमी, मुळशी येथे २३० मिमी, माथेरान येथे ३०२ मिमी, कर्जत येथे २९१.५ मिमी, पनवेल येथे १८२.५ मिमी, जुहू विमानतळ येथे ३२५.० मिमी आणि भाईंदर येथे १८८.५ मिमी पावसाची नोंद झाली.
माथेरान, लोणावळा, खोपोली व लोहगड परिसरात पावसाची तीव्रता अत्यंत जास्त असल्यामुळे भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. या भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.जिल्हा व राष्टीय प्रतिसाद बल यांच्याशी सतत समन्वय साधून बचाव कार्य चालू आहेतSEOC मधून GEO-DSS प्रणाली चा वापर करून धोका आणि प्रवणतेचे सखोल विश्लेषण करून अलर्ट प्रसारित करण्यात येत आहेत.
मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी घाटात दरड कोसळी असल्याने वाहतुक बंद करण्यात आली आहे.खोपोली येथे पाणी साचल्याने जुना महामार्ग बंद आहे. पुणे-मुंबई एक्सप्रेसवे , मिसिंग लिंक रस्ता, दरड कोसळुन एक्सप्रेस-वे दोन्ही बाजूंची वाहतुक बंद आहे. मंकी हिल ते ठाकुरवाडी पर्यंत दरड कोसळल्या रेल्वे वाहतुक बंद आहे. पुणे-मुंबई रेल्वे मार्ग बंद आहे.रस्ते व रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी दरडी हटवण्याचे काम युध्दपातहीवर सुरू आहे.
मावळ तालुक्यातील घोरावाडी येथे (तळेगाव दाभाडे) पुरामध्ये एक बस २५ नगरिकांसाहित अडकली होती, NDRF पथक पाठवून नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
मावळ मधील पाटण येथे एक घर दरडी खाली दबले असून ३ ते ४ नागरिक दबले असण्याची शक्यता आहे. तेथे NDRF टीम पाठविण्यात आली असून बचावय कार्य चालू आहे. मानखुर्द येथे झोपडपट्टीवर इमारत कोसळुन ६ जणांचा मुत्यु व १ जखमी झाले असून बचाव कार्य चालू असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असेराज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या वतीने कळविण्यात आले आहे.
0000
किरण वाघ/विसंअ
