Bullet Train Project, TBM Machine : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात आणखी एक मोठी घडामोड घडली आहे. देशातील सर्वात मोठ्या मशीनपैकी एक आता कामाला लागले असून, यानंतर प्रकल्पाच्या पुढील टप्प्यांना वेग मिळण्याची शक्यता आहे. नेमकं हे मशीन किती मोठं आहे आणि त्याचं काम काय?
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. विक्रोळी येथे रविवारी देशातील सर्वात मोठ्या टनेल बोरिंग मशीनच्या (TBM) मदतीने बोगदा खोदण्याच्या कामाला सुरुवात झाली. विशेष म्हणजे, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकल्पाचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. हे महाकाय मशीन विक्रोळी येथून मुंबईतील बीकेसी बुलेट ट्रेन स्थानकाच्या दिशेने १६ किलोमीटर लांबीचा बोगदा खोदणार आहे. या बोगद्यातून अप आणि डाऊन अशा दोन्ही बुलेट ट्रेनचे मार्ग तयार केले जाणार आहेत. या संपूर्ण भुयारी मार्गाची लांबी २१ किलोमीटर आहे. त्यापैकी पाच किलोमीटरचे काम यापूर्वीच पूर्ण झाले असून, आता उर्वरित १६ किलोमीटरचा टप्पा TBMच्या मदतीने पार पडणार आहे. या बोगद्याचा काही भाग ठाणे खाडीखालून जाणार आहे.
मुंबईतील दाट लोकवस्ती आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांखालून हे मशीन मार्ग काढणार आहे. बीकेसी परिसरातील उंच इमारती, रस्ते, मिठी नदी आणि इतर महत्त्वाच्या भागाखालून बोगद्याचे काम करण्यात येणार असल्याने हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. १५ ऑगस्ट २०२७ रोजी या प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. सुरुवातीला गुजरातमधील सूरत ते बिलिमोरा या दरम्यान बुलेट ट्रेन धावणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एनआयशी बोलताना दिली.
Crime News : ती 21 तास विहिरीत होती; जीव वाचल्यानंतर उघड झाली अंगावर काटा आणणारी थरारक कहाणी, महिलेसोबत काय घडलं?
५०० हत्तींच्या वजनाएवढं मशीन
या टप्प्यानंतर मुंबईतील भुयारी मार्गाच्या कामाला आणखी वेग मिळणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे प्रकल्पाच्या पुढील कामांनाही गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या प्रकल्पासाठी वापरण्यात येणारे टनेल बोरिंग मशीन हे भारतातील रेल्वे बोगद्याच्या कामासाठी वापरले जाणाऱ्या सर्वात मोठ्या मशीनपैकी एक आहे. त्याचा कटरहेड तब्बल १३.६ मीटर व्यासाचा असून तो चार मजली इमारतीएवढा आहे.
या मशीनचे वजन सुमारे ३,१०० टन म्हणजे जवळपास ५०० आशियाई हत्तींच्या वजनाइतके आहे. तर त्याची एकूण लांबी ९६ मीटर असून ती जवळपास एका फुटबॉल मैदानाइतकी आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा