• Thu. Sep 3rd, 2026

शिंदेंची ऑफर धुडकावली, वसंत मोरे मातोश्रीवर, १३० शिवसैनिकांची घोषणाबाजी

ByMH LIVE NEWS

Jul 5, 2026 #mt
शिंदेंची ऑफर धुडकावली, वसंत मोरे मातोश्रीवर, १३० शिवसैनिकांची घोषणाबाजी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

ऑपरेशन टायगरमुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. तर त्यानंतर ठाकरेंचे विश्वासू समजले जाणारे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनीही जय महाराष्ट्र करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत असताना अहिर यांच्याकडे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी होती. त्यामुळे त्यांच्या निर्णयामुळे ठाकरेंसोबतच पुण्यातील शिवसैनिकांनाही तितकाच मोठा धक्का बसला आहे. सचिन अहिर यांच्यानंतर आता पुण्यात ठाकरे गटाचा नवीन संपर्कप्रमुख कोण असेल याबद्दल राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. अशातच पुण्यातील डॅशिंग नेते अशी ओळख असलेले वसंत मोरे यांनी निष्ठावंत शिवसैनिकांसह मातोश्री दर्शन मोहीम काढली. पुण्यातील शिवसैनिकांसह मोरेंनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed