• Sat. Jul 4th, 2026

    Pune News: प्रेमविवाह करून बारामतीतून पुण्यात शिफ्ट झाले, पण पती ऑफिसमधील मुलीच्या प्रेमात पडला; तरुणीने जीवन संपवलं!

    Pune News: प्रेमविवाह करून बारामतीतून पुण्यात शिफ्ट झाले, पण पती ऑफिसमधील मुलीच्या प्रेमात पडला; तरुणीने जीवन संपवलं!

    हडपसर : प्रेमविवाह करून संसार सुरू केलेल्या २५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पती आणि त्याच्या कथित प्रेयसीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पतीला अटक केली आहे.

    वृषाली भीमराव आरडे ऊर्फ वृषाली रोहित घोडे (वय २५) असे मृत विवाहितेचे नाव आहे. पती रोहित मच्छिंद्र घोडे आणि तृप्ती वाकचौरे अशी आरोपींची नावे आहेत. वृषालीची आई लक्ष्मी आरडे (रा. इंदापूर) यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. वृषाली आणि रोहित यांनी सप्टेंबर २०२१ मध्ये प्रेमविवाह केला होता. काही काळ बारामती येथे वास्तव्यानंतर ते पुण्यात स्थायिक झाले. मागील दोन वर्षांपासून ते उरुळी देवाची येथील वैष्णव सिटी परिसरात राहत होते. रोहित डी-मार्टमध्ये नोकरी करीत असून, तेथे त्याचे प्रेमसंबंध जुळले. याच कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद होत होते. यातून २७ जून रोजी वृषालीने गळफास घेतला.

    दरम्यान, तपासादरम्यान तिच्या मोबाइलमध्ये सुसाइड नोट आढळली असून त्याआधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

    लिव्ह-इन पार्टनरवर चाकूने हल्ला

    एकीकडे पतीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे पत्नीने आत्महत्या केल्याची घटना घडलेली असताना दुसरीकडे खेड तालुक्यात लिव्ह-इन पार्टनर महिलेवर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. एकत्र राहत नसल्याच्या कारणावरून तरुणाने त्याच्या लिव्ह-इन पार्टनर महिलेवर चाकूने हल्ला केला; तसेच त्यांच्या दोन वर्षांच्या मुलीला पळवून नेले. ही घटना गुरुवारी खेड तालुक्यातील आंबेठाण परिसरात घडली. पीडित महिलेने उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, चांगदेव नागनाथ मुंडे (वय ३०, मैंदवाडी, बीड) याला पोलिसांनी अटक केली.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी हे दोन वर्षांपासून एकत्र राहत होते. ते दोघेही मजुरीचे काम करतात. त्यांना स्वरा नावाची मुलगी आहे. आरोपी गेल्या काही दिवसांपासून दारू पिऊन फिर्यादी महिलेला मारहाण करीत होता. त्यामुळे महिला आपल्या मुलीसह आरोपीपासून विभक्त राहत होती. या गोष्टीचा राग मनात ठेवून एक जुलै रोजी दुपारी एक वाजता आरोपी फिर्यादीच्या घरी गेला. चाकूने फिर्यादीच्या छातीवर वार करून तिला जखमी केले; तसेच मुलीला सोबत घेऊन गेला.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed