• Sat. Jul 4th, 2026

    Mumbai News: साकीनाका मृत्यू प्रकरणात पोलिसांना कंत्राटदार सापडेना; ३ मजूर सापडले, त्यांनाच ताब्यात घेतले!

    Mumbai News: साकीनाका मृत्यू प्रकरणात पोलिसांना कंत्राटदार सापडेना; ३ मजूर सापडले, त्यांनाच ताब्यात घेतले!

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: अंधेरीच्या साकीनाका येथील मॅनहोल दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदारासह घटनास्थळावरील कामगारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात तीन कामगारांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. मात्र मुख्य कंत्राटदार अजूनही फरार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

    साकीनाका येथील खैराणी रोडवर असलेल्या उघड्या मॅनहोलमध्ये पडून ५५ वर्षीय अस्लम शेख यांचा गुरुवारी मृत्यू झाला होता. कंत्राटदाराची निष्काळजी शेख यांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. याप्रकरणी महापालिकेच्या एल विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी साकीनाका पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार कंत्राटदारासह कामगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    घटनेचे गांभीर्य लक्षात घेता गुन्हा दाखल होताच साकीनाका पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. यासाठी मॅनहोलच्या ठिकाणी काम करणाऱ्या तीन मजुरांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून कंत्राटदाराबाबत अधिक माहिती घेण्यात येत आहे. त्याला शोधण्यासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. या ठिकाणी कोणतेही काम करण्याची गरज नव्हती. कंत्राटदाराला कोणत्याही प्रकारची ‘वर्क ऑर्डर’ देण्यात आली नव्हती, असेही म्हटले जात आहे. या सर्व बाबींचा तपास केला जात असून, याबाबत महापालिका अधिकाऱ्यांकडूनही सर्व माहिती घेतली जात असल्याचे या अधिकाऱ्याने नमूद केले.

    चेंबूर, साकीनाका दुर्घटनांनंतर जाग

    चेंबूर आणि साकीनाका येथे झालेल्या घटनांनंतर मुंबई महापालिका सक्रिय झाली आहे. चेंबूर येथे झाड कोसळून झालेल्या घटनेनंतर प्रत्यक्ष घटनास्थळी महापालिकेने नियुक्त केलेल्या चौकशी समिती सदस्यांनी पाहणी केली. तर साकीनाका येथे मॅनहोलच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्व मॅनहोलची तपासणी केली जात असून दोन दिवसांत १६ हजार ६२३ मॅनहोलची तपासणी करण्यात आली आहे.

    पालिकेने उपायुक्त आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) पुरुषोत्तम मालवदे आणि उपमहानगरपालिका आयुक्त (अभियांत्रिकी) शशांक भोरे यांची दोन सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे. शुक्रवारी समितीसोबत वृक्षतज्ज्ञांनी पडलेल्या झाडाची तसेच त्याच्या मुळांची बारकाईने तपासणी केली. प्राथमिक निरीक्षणानुसार, रस्त्याच्या उत्खनन, काँक्रीटीकरणादरम्यान झाडाच्या एका बाजूच्या आधार देणाऱ्या संरचनात्मक मुळांना कापले गेले किंवा त्यांचे नुकसान झाले असावे. त्यामुळे मुळांपासून झाडाच्या बुंध्यापर्यंत अंतर्गत कुज निर्माण झाली. त्यामुळे झाडाचा तोल केवळ विरुद्ध बाजूच्या मुळांवर अवलंबून राहिला आणि दुर्घटनेच्या दिवशी झालेला मुसळधार पाऊस व वाऱ्यामुळे कमकुवत झालेले झाड कोसळल्याचा प्राथमिक निष्कर्ष समितीने नोंदविला.

    दुसरीकडे, साकीनाका घटनेनंतर मुंबईतील सर्व मॅनहोलची तपासणी केली जात आहे. मुंबईत १ लाख ३ हजार ९२६ मॅनहोल असून त्यापैकी ४ हजार ४४६ मॅनहोलवर संरक्षक जाळ्या बसवण्याचे काम सुरूच आहे. गुरुवार आणि शुक्रवारी १६ हजार ६२३ मॅनहोलची तपासणी केली.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed