छत्रपती संभाजीनगर: शहरातील व्हीआयपी जालना रोडवर २ जुलै रोजी पहाटे झालेल्या भंगार व्यावसायिक अब्दुल बासित हकीम खान यांच्या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. केवळ टोळीच्या मुख्य मोहरक्याचा गोव्याला जाऊन आलिशान क्रूझवर वाढदिवस साजरा करायचा होता आणि त्यासाठी पैसे गोळा करण्यासाठी या टोळीने शहरात लुटमारीचा उच्छाद मांडला होता, अशी अत्यंत चक्रावून टाकणारी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने मुख्य आरोपी मुकेश उर्फ मुक्या महेंद्र साळवे (वय २९) आणि विक्की उर्फ सोनू मधुकर पाचवणे (वय २२, दोघे रा. मुकुंदवाडी) यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. न्यायालयाने त्यांना ८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
तंबाखू मागितली, नकार देताच भोसकला चाकू!
१ जुलै रोजी रात्री कामाच्या निमित्ताने बाहेर पडलेले अब्दुल बासित हे मध्यरात्री सिडको बसस्थानकावरून रिक्षाने आले. एसएफएस शाळेजवळ उतरून ते रस्ता ओलांडून जिन्सीच्या दिशेने पायी निघाले होते. रात्री अडीचच्या सुमारास आकाशवाणी चौकातील पंचम बारसमोर मागून आलेल्या मुक्या साळवे आणि विक्की पाचवणे यांनी अब्दुल यांना अडवले आणि त्यांच्याकडे तंबाखू मागितली. मी कोणतेही व्यसन करत नाही, असे अब्दुल यांनी सांगताच नराधमांनी त्यांचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत मुख्य आरोपी मुक्याने अब्दुल यांच्या मांडीत खोलवर चाकू खुपसला. चाकूमुळे त्यांची मुख्य रक्तवाहिनी कापली गेल्याने प्रचंड रक्तस्त्राव होऊन रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
हत्या करून घरी जाऊन निवांत झोपले, अन् सीसीटीव्हीत …
अब्दुल यांच्यावर वार केल्यानंतर पोलिसांना गुंगारा देण्यासाठी या हल्लेखोरांनी जाणीवपूर्वक मुख्य रस्ते बदलले. अपेक्स रुग्णालय, चिश्तिया चौक, कॅनॉट प्लेस आणि सिडको ब्रिजवरून जात हे दोघे मुकुंदवाडी गावातील आपल्या घरी पोहोचले आणि निवांत झोपी गेले. हा सर्व थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. फुटेजमधील संशयितांच्या अंगकाठीवरून गुप्त बातमीदाराने तो कुख्यात गुंड मुक्या साळवेच असल्याचे ओळखले. यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, जिन्सीचे निरीक्षक गणेश ताठे यांच्या संयुक्त पथकाने आरोपींच्या घरात घुसून त्यांना बेड्या ठोकल्या.
२५ हून अधिक गुन्हे अन् वाढदिवसाच्या आधीच गेम ओव्हर
या घटनेने शहर पोलिसांच्या आणि विशेषतः मुकुंदवाडी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. मुख्य आरोपी मुक्या साळवे याच्यावर तब्बल २५ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. मुख्य आरोपी मुक्या साळवे याचा ३ जुलै रोजी वाढदिवस होता. आपल्या गुन्हेगार मित्रांना गोव्याला नेऊन क्रूझवर पार्टी देण्याचा त्याचा प्लॅन होता. त्यासाठीच पैसे कमी पडत असल्याने त्यांनी जालना रोडवर लुटमार सुरू केली होती. मात्र, वाढदिवसाच्या अवघ्या एक दिवस आधीच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळत थेट लॉकअपची हवा दाखवली आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा