• Sat. Jul 4th, 2026
    Uddhav Thackeray: अब हिंदू माफ नहीं करेगा! राम मंदिर अपहारप्रकरणी उद्धव ठाकरे आक्रमक, ५ जुलैला दादरमध्ये ‘रामरक्षा’ आंदोलन

    Uddhav Thackeray: लूट करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी करतानाच याप्रकरणी मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

    उद्धव ठाकरे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : देशात खासदार, आमदार फोडाफोडीसाठी राम मंदिराच्या लुटीचा पैसा वापरला का, असा बोचरा प्रश्न करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राम मंदिरातील दानपेटीतील लुटीच्या पार्श्वभूमीवर भाजपवर निशाणा साधला.

    मातोश्रीवर बोलावलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी या आंदोलनाची घोषणा केली. ‘राम मंदिरातील दानपेटीतून कोट्यवधींचे दान चोरीला गेले आहे. त्यात आठ जणांना अटक करण्यात आली आहे. चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.

    Maharashtra TimesMumbai Fire: इमारतीत अग्नितांडव, रहिवासी अडकले; जीव वाचवण्यासाठी तिसऱ्या, चौथ्या मजल्यावरुन उड्या, मुंबईत थरार
    आज जी काही दरोडेखोरी चाललेली आहे, राजकीय पक्ष फोडले जाताहेत, आमदार-खासदार चोरले जात आहेत, खरेदी-विक्री चालू आहे याला ऑपरेशन नाव दिले जातेय. मात्र आता भाजपच ऑपरेशन राम मंदिर करत आहे का? आता या बातम्या दाखवल्या जात असतील नसतील, पण चोरी होत आहे. राम मंदिरावर दरोडा टाकला जात आहे. काहींच्या मते हा चोरीचा पैसा इतरांचे पक्ष फोडण्यासाठी केला जात आहे’, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. रविवारच्या आंदोलनात सर्वांनाच सहभागाचे आवाहनही त्यांनी केले.

    Maharashtra TimesNarhari Zirwal : महाराष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय, शाळांपासून 500 मीटर अंतरावरच्या दुकानांमध्ये ‘Sting’ एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी
    ‘हिंदू त्यांना त्यांची जागा दाखविणार’
    ‘हिंदू मार नहीं खाएगा, असे एकदा भाजप नेते अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते. आज मी तसेच म्हणतोय अब हिंदू माफ नहीं करेगा. जे जे मंदिर लुटत आहेत, हिंदू त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्याची सुरुवात आम्ही येत्या रविवारपासून करतो आहोत. राम मंदिर दानपेटीतील या चोरीविरोधात आमची शिवसेना आंदोलन करणार आहे. येत्या रविवारी संध्याकाळी दादर कबुतरखान्याजवळ मारुती मंदिरात रामरक्षा आंदोलन करणार आहोत’, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. ‘जाब विचारण्यासाठी आम्ही तिथे रामरक्षा म्हणू, हनुमान स्तोत्र आणि हनुमान चालिसा म्हणू’, असेही त्यांनी सांगितले.

    संघ व्यथित, संतप्त
    अयोध्येतील राम मंदिरातील दानपेट्यांमध्ये अर्पण केलेल्या वस्तू आणि रोख रकमेच्या अपहार प्रकरणामुळे आम्ही अत्यंत व्यथित आणि संतप्त झालो आहोत. या प्रकरणामुळे संपूर्ण हिंदू समाजाच्या आणि रामभक्तांच्या भावनांना तीव्र धक्का बसला आहे. चौकशीत जो कोणी दोषी आढळेल त्याला कठोरातील कठोर शिक्षा दिली जावी, यासाठी आग्रह धरला जाईल’, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या संपूर्ण प्रकरणावर शुक्रवारी तीव्र नाराजी व्यक्त केली.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा