• Wed. Aug 19th, 2026

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची विजया मेहता यांना श्रद्धांजली – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jul 2, 2026
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची विजया मेहता यांना श्रद्धांजली – महासंवाद

मुंबई, दि. २ : ज्येष्ठ नाट्य निर्मात्या व दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या निधनाबद्दल राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी दुःख व्यक्त केले आहे.

असामान्य प्रतिभा, दूरदृष्टी, प्रयोगशीलता आणि सृजनशीलतेच्या बळावर त्यांनी मराठी रंगभूमी आणि भारतीय चित्रपटसृष्टीला नवी उंची प्राप्त करून दिली. त्यांच्या कार्याचा ठसा नाट्य विश्वावर कायमस्वरूपी उमटला असून, त्यांचे कार्य भावी पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल. राज्यातील गुणग्राहक रसिकांच्या वतीने मी दिवंगत विजया मेहता यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

0000

जसंअ/लोकभवन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed