खासदार अमोल कोल्हे यांनी केलेल्या एका वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. तसेच अमोल कोल्हे यांनी ऑफरबाबतही मोठं विधान केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जयेश साबळे, नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. देवेंद्र फडणवीस इन्फ्रामॅन असल्याचं अमोल कोल्हे म्हणाले आहेत. तसेच सत्ताधाऱ्यांनी सोबत येण्याची ऑफर दिली आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी अमोल कोल्हे यांना विचारला असता त्यांनी राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावतील असं वक्तव्य केलं आहे. आपल्याला अजून ऑफर आलेली नाही. पण आल्यास विचार करु, असं सूचक वक्तव्य अमोल कोल्हे यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
अमोल कोल्हे फडणवीसांबद्दल काय म्हणाले?
“आता भविष्यातील केंद्रीय पातळीवरच्या नेत्यांबाबत ज्या लोकांची नावे घेतली जातात, याबाबत दिल्लीच्या राजकीय वर्तुळातही चर्चा होते. यामध्ये मराठी माणसाचं नाव घेतलं जात असेल तर ही चांगली गोष्ट आहे ना, फडणवीसांचं नाव इन्फ्रामॅन म्हणून येत असेल तर चांगली गोष्ट आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव दिल्लीत जसं वेगळ्या आदराने घेतलं जातं, तसं दिल्लीत देवेंद्र फडणवीस यांचं नाव इन्फ्रामॅन म्हणून घेतलं जातं. मी महाराष्ट्राचा लोकप्रतिनिधी म्हणून राजकीय पक्ष बाजूला ठेवून याबाबतची अपेक्षा व्यक्त करतो”, अशा शब्दांत अमोल कोल्हे यांनी फडणवीसांचं कौतुक केलं.
सत्ताधाऱ्यांची ऑफर आली का?
पत्रकारांनी सत्ताधाऱ्यांची सोबत येण्याची ऑफर आली का? असा प्रश्न खासदार अमोल कोल्हे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर चर्चेला कारण ठरलं आहे. “अशी ऑफर माझ्याकडे आतापर्यंत आलेली नाही. अशी काही ऑफर आली तर विचार करु. मी विचार करु असं म्हणालो आहे, जाऊ असं म्हणालेलो नाही”, असं अमोल कोल्हे म्हणाले. अमोल कोल्हे यांच्या या वक्तव्यावर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
रोहित पवारांची प्रतिक्रिया
दरम्यान, अमोल कोल्हे यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “काहीही झालं तरी आमचे आमदार आणि खासदार फुटणार नाहीत. आमचा सगळ्या खासदारांवर विश्वास आहे. डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावरही विश्वास आहे. त्यामुळे तसं काही होणार नाही. कुणी कुठेतरी चर्चा केली असावी. किंवा भाजपमधून मुद्दामून काही लोकं अशी चर्चा पेरत असावेत. पण काही झालं तरी आमचा पक्ष फुटेल असं मला तरी वाटत नाही”, असं रोहित पवार म्हणाले आहेत.
पाच खासदार सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार?
दरम्यान, पत्रकारांनी शरद पवार गटाचे खासदार सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार का? असा प्रश्न अमोल कोल्हे यांना विचारला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “ही माझ्यासाठीच न्यूज आहे. अशा चर्चा केल्या आणि घडवल्या जातात, पण त्याला कोणताही ठोस आधार नाही,” असे ते म्हणाले. “शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण, ही राष्ट्रवादीच्या सर्व खासदारांची स्पष्ट भूमिका आहे. या विषयावर शरद पवार यांनी भूमिका मांडली असून, त्यापुढे अधिक चर्चा करण्याची गरज नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा