• Wed. Jul 1st, 2026

    Rain Update: पर्यटकांसाठी आनंदाची बातमी: लोणावळा, खंडाळ्यासह मावळात जोरदार पाऊस, धबधबे खळाळून वाहू लागले

    Rain Update: पर्यटकांसाठी आनंदाची बातमी: लोणावळा, खंडाळ्यासह मावळात जोरदार पाऊस, धबधबे खळाळून वाहू लागले

    Lonavala Rain: बुधवारी दिवसभर कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे मावळातील ओढे नाले भरुन वाहू लागले असून, नद्यांसह धरणांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे.

    पर्यटकांसाठी आनंदाची बातमी: लोणावळा, खंडाळ्यासह मावळात जोरदार पाऊस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. प्रतिनिधी, लोणावळा: लोणावळा, खंडाळ्यासह मावळात बुधवारी पहाटेपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. मान्सूनचे उशिरा आगमन झाल्याने कोरडे पडलेले धबधबे आता पावसामुळे खळाळून वाहू लागले असून, लोणावळ्याजवळील सहारा पुलाजवळील धबधब्यांच्या पाण्यात शेकडो पर्यटकांनी भिजण्याचा आनंद लुटला आहे. तर मावळातील पवन मावळात पवनेच्या पाण्याच्या आधारावर भात पेरणी केलेल्या भात रोपांची मोठी वाढ झाली असून, भात लावणीला सुरुवात झाली आहे. एक महिन्याच्या प्रदीर्घ काळानंतर आगमन केलेल्या मान्सूनमुळे शेतकरी वर्गासह सर्व स्तरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.

    मागील दोन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा अनुभव सर्वांना आला. गतवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने सर्वत्र थैमान घातले होते. ऐन मे महिन्यातच ओढे नाले वाहू लागले होते. यामुळे भात खाचरात पाणी साचल्यामुळे भात पेरणी रखडली होती. मान्सूनपूर्व पावसाचा जोर ओसरत नाही तोपर्यंत ३ जूनलाच मान्सूनचे सर्वदूर दमदार आगमन झाल्यामुळे गतवर्षी भात पेरणी एक महिना लांबली. तसेच काहींनी चिखलातच भात पेरणी केली होती. यावर्षीही पुन्हा एकदा निसर्गाच्या लहरीपणाचा प्रत्यय आला आहे. गतवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कोसळलेल्या मान्सूनपर्व तर जूनच्या ३ तारखेला आगमन केलेला मान्सून यंदा अरबी समुद्रात मंदावलेल्या मोसमी वारे आणि ‘एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनचे एक महिना उशिराने आगमन झाले. यामुळे मे महिन्याच्या शेवटच्या आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात भात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना मान्सूनच्या उशिरा आगमनाचा फटका बसला. बळीराजा चातकाप्रमाणे पावसाची प्रतीक्षा करत होता. अखेर तीन दिवसांपूर्वी मान्सूनचे आगमन झाले. गेल्या अनेक वर्षांचा विचार केला असता, पहिल्यांदाच जून सर्वात कोरडा गेल्याची नोंद झाली आहे.

    दरम्यान, बुधवारी मध्यरात्रीपासून लोणावळा खंडाळ्यासह मावळात जोरदार पाऊस कोसळत आहे. लोणावळ्यात मागील २४ तासांत ७२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, यावर्षी आज अखेरपर्यंत केवळ ४७३ मिलीमीटर (१८.६२ इंच) पावसाची नोंद झाली आहे. मात्र गतवर्षी आज अखेरपर्यंत सुमारे १९९८ मिलीमीटर (७८.६६ इंच) पावसाची नोंद झाली होती. गतवर्षी आणि या वर्षीच्या तुलनेत मोठी तफावत आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा