• Tue. Jun 30th, 2026
    Sachin Ahir : अरुण गवळींचा भाचा, मुंबईत सर्वात मोठी दहीहंडी उत्सवासाठी ओळखलं जाणारं नाव; ठाकरेंना धक्का देणारे सचिन अहिर कोण आहेत?

    Who is Sachin Ahir? : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा धक्कातंत्र वापरलं आहे. ठाकरेंचे विश्वासू शिलेदार सचिन अहिर यांना आपल्याकडे खेचण्यात त्यांना यश आलं आहे. सचिन अहिर नेमके कोण आहेत? ते जाणून घ्या

    सचिन अहिर शिवसेना प्रवेश(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे ंना मोठा धक्का दिला आहे. फक्त दोनच आठवड्यात एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना दुसरा धक्का दिला आहे. यावेळी उद्धव ठाकरेंच्या अत्यंत विश्वासू अशा शिलेदाराला आपल्याकडे खेचण्यात एकनाथ शिंदेंना यश आलं आहे. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे वरळी विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर शिंदेंच्या गळाला लागले आहेत. ठाकरेंनी त्यांना विधान परिषदेवर पाठवलं होतं. त्यांनी वरळी विधानसभेतही वरळी मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलेलं. पण, आता शिवसेना शिंदे गटाकडून सचिन अहिर यांनी विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केल्यानं ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.

    आदित्य ठाकरे मोठा धक्का

    सचिन अहिर यांच्या शिंदे शिवसेनेत प्रवेशानंतर आदित्य ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. वरळी मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन विधान परिषदेचे आमदार होते त्यातील सचिन अहिर एक होते. मागील काही दिवसांपासून सचिन अहिर यांना शिंदे शिवसेनेकडून प्रवेशाची ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर आली होती. पण, खासदार संजय दिना पाटील यांच्या प्रवेशानंतर सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करण्यासाठी तयार झाल्याची माहिती, समोर आली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक पाहता शिंदे शिवसेनेकडून त्यांना उपसभापती पदाची संधी देण्यात येईल, असं आश्वासन देण्यात आलं आहे. त्यानंतर तातडीनं शिंदे शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय सचिन अहिर यांनी घेतल्याची माहिती समोर येत आहे.
    Maharashtra TimesSachin Ahir : ठाकरेंना सर्वात मोठा हादरा, सचिन अहिर यांनी शिवबंधन सोडलं, थेट विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाचं तिकीट, वरळीत राजकीय भूकंप

    कोण आहेत सचिन अहिर?

    मुंबईच्या राजकारणात सचिन अहिर हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू नेते मानले जातात. अहिर म्हणजे मुंबईत साजऱ्या केल्या जाणाऱ्या मोठ्या ‘दहीहंडी’ उत्सवासाठी ओळखलं जाणारं एक नाव आहे. आपल्या पत्नीसोबत सचिन अहिर ‘श्री संकल्प प्रतिष्ठान’ ही संस्था चालवतात. याच संस्थेमार्फत ते मोठ्या दहीहंडी उत्सवाचं आयोजन करतात. संपूर्ण वरळी परिसरात सचिन अहिर यांची संस्था लोकप्रिय आहे.

    सचिन अहिर यांनी 1993 मध्ये ‘राष्ट्रीय मिल मजदूर संघा’पासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. सुरुवातीला सचिव म्हणून काम पाहिल्यानंतर, त्यांची या संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर, 1996 पासून त्यांनी ‘महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघा’चं नेतृत्वही केलं आहे. माझगाव डॉक आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांसारख्या संस्थांमधील कामगार संघटनांचे नेतृत्व करताना, त्यांनी संबंधित उद्योगांमधील कामगारांसाठी वेतनवाढीचा करार घडवून आणला आणि कामगार चळवळीवर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला. या कामगिरीमुळे त्यांना गिरणगावात मोठी प्रसिद्धी मिळाली.
    Maharashtra TimesSachin Ahir : ठाकरेंचे विश्वासू, विधान परिषदेवर संधी, तरी शिवबंधन का सोडलं? सचिन अहिरांच्या धक्कादायक निर्णयामागील कारण समोर

    सचिन अहिर यांची राजकीय कारकिर्द

    सचिन अहिर ठाकरे गटाचे सध्याचे वरळी विधानपरिषदेचे आमदार

    विधानसभा निवडणुकीत तीनवेळा तर विधानपरिषदेवर एकदा विजयी झालेले

    2009 ला गृहनिर्माण राज्यमंत्रिपदी

    मामा अरुण गवळी सचिन अहिरांसमोर! दगडी चाळीत नेमकं काय घडलं?

    26 जुलै 2019 ला राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल

    2020 मध्ये अखंड शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती

    2022 मध्ये विधानपरिषदेवर सदस्य म्हणून नियुक्ती

    30 जून 2026 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत विधानपरिषदेच्या उपसभापतीपदासाठी भरला अर्ज

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा