Nashik Food Poison : द्वारकाबाई यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले असून विषबाधेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही. नमुने पुणे प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, नाशिक : बागलाण तालुक्यातील आखतवाडे येथे मटणाच्या जेवणानंतर दही खाल्ल्याने शेतकरी दाम्पत्याला विषबाधा झाल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. यात द्वारकाबाई शांताराम ह्याळीज (वय ६८) यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे पती शांताराम नानाजी ह्याळीज (७८) यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर मालेगाव येथील खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
मटणानंतर दही खाललं
नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील आखतवाडे येथे राहणाऱ्या ह्याळीज कुटुंबीयांनी शनिवारी (दि. २७) रात्री मटणाचे जेवण केले. त्यानंतर दही खाण्यात आल्याने ह्याळीज दाम्पत्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यांचा मुलगा आधार ह्याळीज यांनी दोघांना तातडीने नामपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, द्वारकाबाई यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. विषबाधेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसून, नमुने पुणे प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
कुटुंबातील तिघांचेही तेच भोजन
“मी आधी मटण खाल्ले होते. जवळपास एका तासानंतर आई-वडील जेवले. त्यानंतर एक-दीड तासाने आईला उलट्या-जुलाबाचा त्रास सुरु झाला. बाबांनाही त्रास होत होता. मी आईला दवाखान्यात चल म्हणत होतो, पण ती ऐकत नव्हती. नंतर आईची तब्येत खूपच खालावली आणि तिचा मृत्यू झाला.” अशी माहिती मुलाने दिली. Vaibhav Jadhav : व्हिडिओ कॉल करुन दाखव मला, केतनचा टॅक्सी चालकाला फोन; सिया-साहिलची भांडणं ते फूड मॉलवरील अजब प्रकार, वैभव जाधव काय म्हणाला? शांताराम ह्याळीज यांना शनिवारी रात्री अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाणही केवळ ५५ टक्के होते. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. तसेच त्यांचे ब्लड प्रेशरही कमी झाल्यामुळे त्यांना औषधे दिली जात आहेत. त्यांची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दुसरीकडे, सिडकोतील कामटवाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात धनुर्वात आणि घटसर्प प्रतिबंधक लस घेण्यासाठी आलेल्या श्रावणी अनिल पाटील (वय १६) हिचा मृत्यू तीव्र ॲलर्जिक प्रतिक्रियेमुळे झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने काढला. मृत्यूचे सविस्तर कारण शोधण्यासाठी तिच्या त्वचेचे, रक्ताचे नमुने तसेच ‘व्हिसेरा’ नाशिक व छत्रपती संभाजीनगर येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.
कामटवाडे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात २४ जून रोजी १२ वाजून ४० मिनिटांनी श्रावणीला धनुर्वात व घटसर्प प्रतिबंधक लस देण्यात आली. घरी जात असताना चक्कर येऊन ती खाली कोसळली. पालकांनी तिला खासगी रुग्णालयात नेले, नंतर तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिला मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. Mumbai Crime : गिरगावात देह व्यापाराचा अड्डा उद्ध्वस्त, मराठी चित्रपटातील आघाडीच्या अभिनेत्रीची सुटका, सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट रंगेहाथ सापडला तिचा मृत्यू तीव्र ॲलर्जिक प्रतिक्रियेमुळे झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने काढला. तसेच ज्या व्हायलमधून श्रावणीला लशीचे इंजेक्शन दिले होते, त्यातील शिल्लक लशीचे नमुनेही तपासणीसाठी हिमाचल प्रदेशातील केंद्रीय संशोधन संस्थेकडे पाठविण्यात आले आहेत. या लशीमध्ये काही दोष तर नाही ना, याचा तपास केला जात आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा