MSRTC Officials: राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सोमवारी आपलं काम सुधारून उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी अधिकाऱ्यांना एका महिन्याची मुदत देण्यात आली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: एसटी महामंडळाच्या उत्पन्नात अपेक्षित वाढ करण्यात सातत्याने अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांना आता बदली, पदावनती आणि निलंबनासारख्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. एसटी अधिकाऱ्यांनी उत्पन्नवाढीसाठी एका महिन्याची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत ठोस परिणाम दिसून आले नाहीत, तर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करावे
मुंबई सेंट्रलस्थित महाराष्ट्र वाहतूक भवन येथे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष सरनाईक यांनी आर्थिक उत्पन्नवाढीबाबत सोमवारी आढावा बैठक घेतली. सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे आता एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदारीचे भान ठेवून उत्पन्नवाढीसाठी अधिकाधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. केवळ बैठका आणि कागदी घोडे नाचवू नयेत, अशा परखड सूचना मंत्री सरनाईक यांनी बैठकीत दिल्या आहेत.
Nashik Traffic Update : नाशिककरांसाठी मोठी बातमी! 30 जून ते 3 जुलै काळात वाहतुकीत मोठे बदल
एप्रिल व मे महिन्यात भाडेवाढीनंतरही महामंडळाला तोटा झाला आहे. हे दोन महिने वर्षातील सर्वाधिक महसुलाचे महिने असतात. मात्र याच कालावधीत राज्यातील ३१ पैकी २१ विभाग तोट्यात आहेत. यामुळे एसटीच्या उपाध्यक्षांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
‘एसटीची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी अधिकारी वर्गाने आता निकाल दाखवून देण्याची वेळ आली आहे. काम करणाऱ्यांना संपूर्ण पाठबळ मिळेल; मात्र अकार्यक्षमता, उदासीनता आणि निष्क्रियता खपवून घेतली जाणार नाही. एक महिन्यानंतर कामगिरीच्या आधारे निर्णय घेतले जातील आणि आवश्यक असल्यास बदली, पदावनती किंवा निलंबनासारखी कठोर कारवाई करण्यात येईल,’ असा थेट इशारा मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला.
Mumbai Metro 4: वडाळा-कासारवडवली मेट्रोच्या कारशेडचा मार्ग मोकळा, पण कांदळवन बाधित होणार; वनक्षेत्र हस्तांतरणाला मंजुरी
विशेष समिती रोखणार अनियमितता
3 महामंडळाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे महाव्यवस्थापक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. एसटी मुख्यालयासह अन्य ठिकाणच्या अनियमिततेची चौकशी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. प्रत्येक आगार, विभाग, प्रादेशिक कार्यालय आणि मुख्यालयातील अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे स्वतंत्र मूल्यमापन केले जाणार आहे. प्रवासी वाढ, उत्पन्नवाढ, फेऱ्यांचे नियोजन, खर्चनियंत्रण, बसचा कार्यक्षम वापर आणि स्थानिक स्तरावरील नावीन्यपूर्ण उपक्रम या सर्व बाबींचा आढावा घेऊन दोषी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा