• Mon. Jun 29th, 2026
    Uddhav Thackeray: वाघाचे कातडे पांघरलेले ते लांडगेच; उद्धव ठाकरेंची बंडखोर खासदारांवर टीका

    Uddhav Thackeray: महाराष्ट्रातील उद्योग पळवून ते गुजरातला नेले जात आहेत. मना-मनात राम म्हणणाऱ्यांनी मंदिर बांधले, पण आता तिथेही लूट सुरू आहे,’ असे ठाकरे या वेळी म्हणाले.

    उद्धव ठाकरे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : वाघ समजून शिवसैनिकांनी ज्यांना डोक्यावर घेतले, ते प्रत्यक्षात वाघाचे कातडे पांघरलेले लांडगे निघाले. शेतकऱ्यांनी कष्टाचा एक-एक रुपया देऊन ओम राजेला निवडूण आणले, त्यांच्याशीच गद्दारी करणाऱ्या अशा गद्दारांना गाडणे, हाच आता खरा महाराष्ट्र धर्म आहे,’ अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांवर टीका केली. धाराशिव येथे रविवारी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

    मेळाव्यात बोलताना ठाकरे म्हणाले, ‘कालपासून आपण ज्या सभा घेत आहोत, त्या मुळात राजकीय सभा नाहीतच. माझ्या शिवसैनिकांसोबतच्या या कौटुंबिक भेटी आहेत. ही सगळी माझी हक्काची माणसे आहेत . मला ओमराजे पाहिजे होता; तर त्यांना खासदार पाहिजे होता. मी शेवटपर्यंत समजावण्याचा प्रयत्न केला, तरीही त्यांनी गद्दारी केली . देशात आणि राज्यात आज लोकशाहीचे मूल्य हरवत चालले असून, खासदारांना विकत घेऊन पक्ष फोडण्याची अराजकता माजवली जात आहे.’

    Maharashtra TimesUddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी भरसभेत व्हिडिओ दाखवला, आईला धोका दिल्याचा आरोप; आता बंडखोर खासदाराचा पलटवार; काय म्हणाले?
    ‘बहुमत असतानाही पक्ष आणि चिन्ह पळवण्यात आले. मराठी माणसाची अस्मिता जपणारी शिवसेना आणि महाराष्ट्र धर्म संपवण्याचे षडयंत्र केंद्रातील सत्ताधारी करीत आहेत. मेळाव्याला खासदार संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, युवा नेते आदित्य ठाकरे, जिल्हा संपर्क प्रमुख मकरंद राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, प्रवीण स्वामी, अंबादास दानवे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

    Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पत्नीपीडित पुरुषांनी घातल्या पिंपळाला 108 उलट्या प्रदक्षिणा, महाराष्ट्रात एकच चर्चा
    हे तर ‘ऑपरेशन देवेंद्र फडणवीस’
    परभणी : उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या अंतर्गत राजकारणावर बोलताना हे ‘ऑपरेशन टायगर’ नव्हे; तर ‘ऑपरेशन देवेंद्र फडणवीस’ आहे, असे संबोधित मध्य प्रदेशात शिवराजसिंग चौहान यांचे पंख छाटून त्यांना बाजूला केले, कारण ते दिल्लीच्या शर्यतीत येऊ शकत होते . आता तीच वेळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली असून पंतप्रधान पदाच्या शर्यती ते येऊ नयेत म्हणून त्यांचेही पंख कापण्याचे काम सुरू आहे. यातून फडणवीस यांचा आत्मविश्वास ढळत चालला असून ते हतबल झाल्याचे निरीक्षण ठाकरे यांनी नोंदविले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा