• Sun. Aug 16th, 2026

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते पाच वर्षाखालील बालकांना पाजण्यात आला पोलिओचा डोस – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jun 28, 2026
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते पाच वर्षाखालील बालकांना पाजण्यात आला पोलिओचा डोस – महासंवाद

बुलढाणा, दि. २८ : शून्य ते पाच वयोगटातील सर्व मुलांना पोलिओचा धोका टाळण्यासाठी व संपूर्ण उच्चाटनासाठी  भारत सरकारद्वारे पल्स पोलिओ लसीकरण मोहीम आज पासून देशभर राबविली जात आहे. शून्य ते पाच वयोगटातील सुमारे 15.6 करोड बालकांना या मोहिमेअंतर्गत पोलिओचा डोस पाजला जाणार आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली

पोलिओमुक्त भारताचा दर्जा कायम राखण्यासाठी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत २८ जून रोजी ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात येत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील आरोग्य लसीकरण बुथला केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी भेट देऊन लसीकरणासाठी आलेल्या बालकाला पोलिओचा डोस पाजला.

या मोहिमेसाठी आरोग्य विभागाने व्यापक नियोजन केले असून देशांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी लसीकरण बूथ उभारण्यात आले आहे. बूथवरील लसीकरणानंतर पुढील पाच दिवस घरभेटींद्वारे वंचित राहिलेल्या बालकांना पोलिओचे डोस देण्यात येणार आहेत. ‘पोलिओ हा कायमस्वरूपी अपंगत्व आणणारा आजार आहे. त्यामुळे ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब देणे अत्यंत आवश्यक आहे. सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना जवळच्या पोलिओ बूथवर आणून लसीकरण करून घ्यावे’ असे आवाहन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed