• Mon. Jun 29th, 2026

    १४६ वर्षांतील सर्वात कोरडा जून; मुसळधार पावसासाठी जुलैची प्रतीक्षा, मान्सून कमकुवत होण्यामागची ‘ही’ पाच कारणं

    १४६ वर्षांतील सर्वात कोरडा जून; मुसळधार पावसासाठी जुलैची प्रतीक्षा, मान्सून कमकुवत होण्यामागची ‘ही’ पाच कारणं

    Weather Update: आठवड्याच्या सुरुवातील महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता. मोसमी वारे पुन्हा सक्रिय होऊन रखडलेला मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात व्यापला. पण त्यानंतर पुन्हा पावसाचा जोर मंदावला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: जून महिन्याअखेरीस भारतात पावसाची ४३ टक्के तूट आहे. ४ जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर द्वीपकल्पात वेगाने वाटचाल करत जूनच्या अखेरीस मोसमी वारे संपूर्ण देशभर पोहचायला हवे होते. पण अजूनही देशातील अनेक भागांमध्ये कोरडं वातावरण आणि निरभ्र आकाश दिसून येत आहे. मध्य भारतात पावसाची ५९ टक्के तूट आहे तर गुजरातमध्ये तब्बल ८४ टक्के कामी पावसाची नोंद झाली. महाराष्ट्रातही सरासरीहून कमी पावसाची नोंद झाली आहे. जून २०२६ गेल्या १ ४६ वर्षांमधील सर्वात कोरडा जून होता.

    केरळ किनारपट्टीवर पोहोचलेला मान्सून १५ जूनपर्यंत दक्षिण, पूर्व, ईशान्य भारतातील बहुतांश भागांमध्ये व्यापला होता. त्यानंतर मोसमी वाऱ्यांची वाटचाल अचानक थांबली. त्यानंतर काही भागांमध्ये पुन्हा पाऊस सुरू झाला. मुंबईमध्ये २३ ते २४ जूनदरम्यान २४ तास मुसळधार पाऊस झाला. पण त्यानंतर पुन्हा एकदा मुंबईत कोरडं वातावरण निर्माण झालं. तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. पुण्यातही गेल्या काही दिवसांपूर्वी मान्सून दाखल झाला असला तरी शहरात फक्त हलक्या सरींची नोंद झाली आहे. घाट परिसरात तर तुरळक पाऊसचं नोंदला गेला.

    Maharashtra TimesEl Nino Impact: एल-निनोचा परिणाम आता थेट तुमच्या जेवणावर होणार, मासे महागणार; इन्कॉइसने दिला इशारा

    मान्सूनचं आगमन होऊनही पाऊस कुठे रखडला?

    भारतातील मान्सून काही कारणांमुळेच कमकुवत होतो. यंदा मान्सूनवर परिणाम करणारे पाच प्रमुख घटक आहेत. सर्वात पहिलं कारण म्हणजे कमकुवत असलेला ‘मॅडेन ज्युलिअन ओस्किलेशन’ (MJO). दर ३० ते ६० दिवसांनी विषुववृत्ताच्या भोवती निर्माण होणाऱ्या ढग आणि वादळी वाऱ्यांना MJO असं म्हणतात. हिंदी महासागरावर दाखल झाल्यामुळे भारतातील मान्सून सक्रिय होतं. पण यंदा जून महिन्यात हा पट्टा भारतापासून दूर गेला.

    त्यानंतर ‘सोमाली जेट’मुळेही मान्सूनवर मोठा परिणाम झाला आहे. ‘सोमाली जेट’ पूर्व आफ्रिकेतून विषुववृत्तावर प्रवास करतो. अरबी समुद्रातील ओलावा भारतापर्यंत वाहून नेतो. पण यावेळी ‘सोमाली जेट’सुद्धा कमकुवत होता. मान्सूनची मुख्य वाहिनी असलेल्या कमकुवत सोमालीमुळे देशभरात मान्सूनवर परिणाम झाला.

    वायव्य भात आणि पश्चिम आशियातील वाळवंटातून वाहणाऱ्या कोरड्या आणि उष्ण हवेमुळे मध्य भारतातील ढगांवर एक पडदा झाकला गेला आहे. या तिसऱ्या गोष्टीमुळे मोसमी वारे रेंगाळले आहेत. चौथं कारण म्हणजे तटस्थ द्विध्रुव (IOD). हिंदी महासागरातील द्विध्रुवामुळे मान्सूनला काहीशी चालना मिळते. पण यंदा तटस्थ राहिल्यामुळे त्या दिशेनेही कोणतीही मदत मिळाली नाही.

    पाचवं आणि शेवटचं कारण म्हणजे बंगालचा उपसागर. यंदा उपसागर कमी दाबाचे पट्टे निर्माण करण्यात अपयशी ठरला. यामुळे पाऊस भारताच्या अंतर्गत भागांमध्ये खेचला जातो. पण तेही कमकुवत असल्यामुळे मोसमी वाऱ्यांना भारताच्या दिशेने खेचण्यासाठी कोणतीही प्रणाली उपलब्ध नव्हती.

    पावसाच्या तुटीसाठी El Nino जबाबदार आहे का?

    एल निनो सक्रिय झाल्याची घोषणा जरी झाली असली तरी त्याची तीव्रता हिवाळ्यापर्यंत वाढू लागते. जुलै, ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यांमध्ये मान्सूनवरील पकड मजबूत होते. त्यामुळे जून महिन्यात झालेल्या कमकुवत पावसाला एल निनो जबाबदार नाही हे स्पष्ट होतं.

    Maharashtra TimesWeather Update: पावसाच्या पुनरागमनाकडे राज्याचं लक्ष, ४८ तासांत कोण-कोणत्या भागांत कोसळणार? हवामान विभागाचा अंदाज जाहीर

    जुलैमध्ये मान्सूनचं पुनरागमन होणार का?

    भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जूनच्या अखेरीस मान्सूनचा प्रवास कमीच राहील पण जुलैच्या सुरुवातीपासून पुन्हा मजबूत होणार आहे. पावसाचा जोर वाढण्यास महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून सुरुवात होईल. त्यानंतर पावसासाठी पोषक वातावरण कायम राहिल्यास संपूर्ण देशात विस्तार होईल. मुंबईसह कोकण किनारपट्टीवरील अनेक भागांमध्ये जुलै महिन्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातही कोसळणार.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा