अमुलकुमार जैन, मुंबई: ठाण्यातील एका कापड व्यावसायिकाने मुंबईतील वरळी सी-लिंक येथून समुद्रात उडी घेत आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. भावेश नवीनचंद्र मजेठिया असे ५१ वर्षीय मृत व्यावसायिकाचं नाव असून ते ठाण्यातील श्रीनगर परिसरात कुटुंबासह वास्तव्यास होते, तर घाटकोपर इथं त्यांचा कपड्याचा व्यवसाय होता.
मिळालेल्या माहितीनुसार, भावेश मजेठिया हे गेल्या सहा महिन्यांपासून व्यवसायात मोठे नुकसान झाल्याने आर्थिक संकटात अडकले होते. कर्जाचा वाढता बोजा आणि आर्थिक विवंचनेमुळे ते गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होते. याच मानसिक तणावातून मजेठिया यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
वरळी सी-लिंकवर नेमकं काय घडलं?
भावेश मजेठिया हे काल सकाळी नेहमीप्रमाणे घरातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी टॅक्सीने प्रवास सुरू केला. मार टॅक्सी वरळी सी-लिंकवर पोहोचताच त्यांनी चालकाला, “मला मळमळत असून उलटी करायची आहे,” असं सांगून टॅक्सी थांबवण्याची विनंती केली. परंतु चालकाने टॅक्सी थांबवताच मजेठिया यांनी आपला मोबाईल, बॅग आणि इतर साहित्य गाडीतच ठेवले व काही क्षणांतच समुद्रात उडी घेतली.
समुद्रात एका व्यक्तीने उडी घेतली असल्याची माहिती मिळताच वरळी पोलिस, सागरी बचाव पथक आणि संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. या सर्व यंत्रणांनी अथक प्रयत्नांनंतर त्यांना समुद्रातून बाहेर काढून तातडीने नायर रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या जवळ आढळलेल्या कागदपत्रांवरून पोलिसांनी त्यांची ओळख पटवली आणि कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. कुटुंबीय व नातेवाईकांच्या जबाबातून व्यवसायातील आर्थिक संकटामुळे ते मानसिक तणावाखाली असल्याची बाब समोर आली आहे.
दरम्यान, याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून, याप्रकरणी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. पोलिसांनी टॅक्सीचालकाचा जबाब नोंदवला असून, घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजसह इतर पुराव्यांच्या आधारे पुढील तपास केला जात आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा