• Sat. Jun 27th, 2026

    APK File Scam: ‘एपीके फाइल’ने 43 कोटींची लूट; 3 हजारांपेक्षा अधिक गुन्हे असणारी टोळी पकडली, मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई

    APK File Scam: ‘एपीके फाइल’ने 43 कोटींची लूट; 3 हजारांपेक्षा अधिक गुन्हे असणारी टोळी पकडली, मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई

    APK File Scam: पोलिसांच्या जनजागृतीमुळे आता सायबर चोर एपीके फाइलऐवजी झिप फाइल वापरू लागले आहेत. झिप फाइलद्वारे आर्थिक फसवणूक होत असल्याचे बनसोडे यांनी सांगितले.

    मुंबई क्राईम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : मुंबई सायबर पोलिसांनी विविध बँका, महानगर गॅस; तसेच इतर आर्थिक संस्थांच्या नावाने एपीके फाइल पाठवून त्याआधारे आर्थिक फसवणूक करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला अटक झाली. हे सहा जण नवी दिल्ली, झारखंड, बिहार येथील असून, देशभरातील ३,२०६ गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग आढळला आहे. प्राथमिक तपासात या टोळीने आतापर्यंत ४३ कोटी रुपये कमाई केल्याचे उघड झाले आहे. या टोळीत आणखी आरोपींचा समावेश असून, त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिस उपायुक्त बजरंग बनसोडे यांनी सांगितले.

    महानगर गॅसच्या नावाने गॅस कनेक्शन बंद करण्याचा संदेश एका व्यक्तीला पाठवला. गॅस बिल अपडेट करण्यासाठी एपीके फाइल डाउनलोड करून या व्यक्तीला १० रुपये पाठविण्यास सांगितले. फाइल डाउनलोड करताच त्याचा मोबाइल हॅक झाला आणि बँक खात्यातून दोन लाख ३५ हजार रुपये काढण्यात आले. याबाबत पश्चिम विभाग सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुवर्णा शिंदे यांच्या पथकाने तपास सुरू केला.

    Maharashtra TimesPrivate Hospitals: मनमानी कारभाराला बसणार चाप! खासगी रुग्णालयांबाबत आरोग्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
    मोबाइल क्रमांक, बँक खाती; तसेच इतर तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण केले असता सहा आरोपींचा सहभाग आढळला. त्यानुसार आरिफ अस्तुन अन्सारी, शेख बेलाल नौशाद, मेहबूब नौशाद आलम, साजिद मन्सूर अली, मोहन कुशल महतो, सुनील कुमार दशरथ सोरेन यांना अटक केली. सायबर पोर्टल वरील तपासात देशभरातील ३,२०६ गुन्ह्यांत या आरोपींचा समावेश असून, महाराष्ट्रात ५१७ आणि मुंबईत या आरोपींविरुद्ध ९३ तक्रारी असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

    Maharashtra TimesMayank Lohar Death Case : मुंबई मयंक लोहार मृत्यू प्रकरण; आरोपी रोशन सुर्वणाला धारधार शस्त्र कुणी दिलं? प्रकरणात डिलिव्हरी बॉय मित्राची एन्ट्री
    सव्वाकोटी एसएमएस
    पोलिसांनी या टोळीकडून ११ मोबाइल आणि एक लॅपटॉप जप्त केल्या आहेत. यात आरटीओ, महानगर गनच्या नावाने १११ बनावट एपीके फाइल सापडल्या आहेत. त्यांनी पाठविलेल्या एपीके फाइल ८,६०९ जणांनी डाउनलोड केल्याचे तांत्रिक विश्लेषणातून दिसून येत आहे. एपीके फाइलद्वारे मोबाइल हॅक केल्यानंतर खात्यातून पैसे काढताना ओटीपी; तसेच इतर संदेश येतात. गुगल फायरबेस आणि होस्टिंगर सर्व्हरमधून सव्वाकोटी एसएमएस या गुन्हेगारांना पाठवल्याचे डेटावरून दिसले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा