• Sat. Jun 27th, 2026
    केतनला टक्कल, विग घालत असल्याने लग्नाची इच्छा उडाली, सियाचा नवीन दावा; लोहगड प्लॅन फेल झाल्यास पुढचा कटही शिजलेला

    Pune Lohagad Trek Ketan Agarwal Death : केतन अगरवालला टक्कल होते की नाही, याविषयी कुठलीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही, परंतु सियाने पोलीस चौकशीत तसा दावा केला

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : केतन अगरवालला टक्कल होते, त्यामुळे तो केसांचा विग घालत होता, ही बाब समजल्याने आपली लग्न करण्याची इच्छा उरली नव्हती, असा दावा सिया गोयल हिने पोलीस चौकशीत केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केतनला ट्रेकिंगची आवड होती, तो गडाच्या कडेवर बसल्याचा फोटो पाहूनच त्याला दरीत ढकलण्याची कल्पना सुचली. हा प्लॅन फेल गेला असता तर अपघातात त्याला ठार मारण्याचाही कट होता, अशी माहिती समोर आली आहे. सिया आणि चेतन एकमेकांवर दोष ढकलत असल्याचं पाहायला मिळत आहे.

    केतनला टक्कल, सियाचा दावा

    केतन अगरवालला टक्कल होते की नाही, याविषयी कुठलीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. परंतु सियाने पोलीस चौकशीत केलेल्या दाव्यानुसार तो विग वापरत असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. टकलामुळे त्याच्याशी लग्न करायचं नव्हतं, असं सिया म्हणाली. पोलीस तपासात सिया सतत नवनवीन दावे करत असल्याचं समोर आलं आहे.
    Maharashtra TimesMira Road News : पार्क गाडीतील एअरबॅग अचानक उघडली, 25 वर्षीय तरुणाच्या मानेवर आघात, गाडीतच मृत्यूने गाठलं

    सियाचे वडील रुग्णालयात

    सिया गोयलचे वडील प्रवीण गोयल प्रकृती अस्वस्थ त्यामुळे रुग्णालयात दाखल आहेत. या वेळी काही वृत्तसंस्थांनी त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी केतन अग्रवाल याच्या मृत्यूविषयी दुःख व्यक्त केले. ‘होणाऱ्या जावयाने आम्हाला मुलापेक्षाही अधिक प्रेम दिले. त्याच्या मृत्यूला आमची मुलगी जबाबदार असेल, तर दोषींनाही कड्यावरून ढकलून द्या,’ अशी भावना सियाच्या आईने व्यक्त केली.

    पंकजाताईंवर गरळ ओकणारे नेते नको; माजलगावात येऊन प्रीतम मुंडेंचा प्रकाश सोळंकेंवर निशाणा

    ‘सिया दुसरी सोनम रघुवंशी’

    मेघालयातील हत्याकांडात मृत्युमुखी पडलेले इंदूरमधील व्यावसायिक राजा रघुवंशी यांच्या आईने गुरुवारी लोहगड किल्ला हत्याकांडातील आरोपी सिया गोयलची तुलना आपली सून सोनम रघुवंशी हिच्याशी केली. २० वर्षीय सियाच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाची भावना दिसत नसून, ती ‘दुसरी सोनम’ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
    Maharashtra TimesSiya Goyal : चेतन रडायला लागला, म्हणाला तुला जमणार नाही, मीच केतनला ढकलतो, सियाचा दावा; एकमेकांवर दोषारोप सुरुच
    गेल्या वर्षी मे महिन्यात राजा रघुवंशी याच्या खून प्रकरणाने देशभर खळबळ माजवली होती. राजा रघुवंशी यांचा मेघालयमध्ये हनिमूनदरम्यान खून केला होता. पत्नी सोनमनेच प्रियकरासह इतरांच्या मदतीने खुनाचा कट रचल्याचा आरोप आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा