• Sun. Jun 28th, 2026
    Sanjay Dina Patil : अखेर संजय दिना पाटील यांचा माफीनामा, पत्रकारांसोबतच्या वादावर जाहीर दिलगिरी व्यक्त

    संजय दिना पाटील यांनी अखेर आपल्या कृत्यावरुन दिलगिरी व्यक्त केली आहे. संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ केली होती. तसेच धमकी देखील दिली होती.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय पाटील यांनी पत्रकारांशी झालेल्या वादप्रकरणी जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे. वादाच्या प्रसंगी अनवधानाने वापरलेल्या अपशब्दांबद्दल त्यांनी संपूर्ण माध्यम समूहाची माफी मागितली आहे. तसेच, “माझ्या राजकीय भूमिकेवर जरूर टीका करा; परंतु माझ्या कुटुंबाला आणि विशेषतः दिवंगत वडिलांना राजकारणात खेचू नका,” अशी विनंती त्यांनी या वेळी केली. विशेष म्हणजे पत्रकारांशी उद्ध्टपणे वागणाऱ्या संजय पाटील यांच्या पत्रकार परिषदेवर पत्रकारांनी बहिष्कार टाकला. यानंतर संजय दिना पाटील यांना व्हिडीओ जारी करुन आपली भूमिका मांडली.

    “मी शिवसेनेत प्रवेश केल्यापासून मला सातत्याने अपमानित केले जात आहे. आज सकाळी पत्रकार मित्र पुन्हा आले तेव्हा मी त्यांना हात जोडून विनंती केली होती की, या विषयावर मला आता काहीही बोलायचे नाही. मात्र, वारंवार तोच प्रश्न विचारण्यात आल्यामुळे वाद वाढला. त्या गडबडीत माझ्याकडून चुकीने अपशब्द निघाले. त्याबद्दल मी सर्व पत्रकार बंधू-भगिनींची मनापासून माफी मागतो”, असं संजय दिना पाटील म्हणाले.

    “विरोधकांनी किंवा अन्य कोणीही माझ्यावर टीका करण्यास माझी हरकत नाही. परंतु, माझ्या पत्नी, मुलगी, आई आणि जे वडील आज हयात नाहीत, त्यांच्याबद्दल खोट्या गोष्टी पसरवणे आणि अपशब्द वापरणे चुकीचे आहे. माझ्या राजकीय भूमिकेवर तुम्हाला जे बोलायचे आहे ते जरूर बोला, पण कृपया माझ्या कुटुंबाला यापासून दूर ठेवा”, अशी विनंती त्यांनी केली. संजय दिना पाटील यांनी जारी केलेल्या व्हिडीओत आपली भूमिका मांडली आहे.

    संजय दिना पाटील व्हिडीओत नेमकं काय म्हणाले?

    “जो प्रकार माझ्यात आणि पत्रकारांमध्ये झालेला आहे, त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. हा प्रकार का घडला? हे जरा सांगू इच्छितो. ज्या दिवसापासून मी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हापासून एकदम वाईट शब्दांत आणि शिवीगाळ करुन अपमान करण्यात येत होते. तरीही मी सर्व अपमान सहन केला”, असं संजय दिना पाटील म्हणाले.

    “तरीसुद्धा आज सकाळी पत्रकार मित्र आले होते. मी त्यांना हात जोडून विनंती केली की, याबद्दल मला काही विचारु नका. मला जे काही बोलायचं होतं ते सर्व बोलून झालेलं आहे. कृपया करुन काही बोलू नका. मी हात जोडून त्यांना विनंती केली. वारंवार सांगत आलेलो आहे की, हा सर्व प्रकार माझा आहे”, असं ते म्हणाले.

    संजय पाटील यांनी मागितली पत्रकारांची माफी

    “मला आपण शिव्या देत आहात ते ठिक आहे. पण माझ्या मुलीला, पत्नीला, माझ्या वडिलांना आणि इतर कुटुंबियांना जे शिवीगाळ करत आहेत त्यांच्यापासून लांब ठेवावं, अशी मी वारंवार विनंती पत्राकारांना करत आलो आहे. आज सकाळी देखील पुन्हा एकदा माझ्या पत्नीबद्दल, वडिलांबद्दल वाईट शब्द, वाईट आणि खोट्या गोष्टी सांगण्यात आल्या. तरी पत्रकार त्याच गोष्टी विचारण्याकरता आले. माझ्याकडून त्यांना विनंती करण्यात आली. पण ते थांबले नाहीत. त्यातून वाद झाला. माझ्याकडून चुकून अपशब्द निघाले. मी त्याबद्दल पुन्हा एकदा पत्रकारांची दिलगिरी व्यक्त करतो”, अशा शब्दांत संजय दिना पाटील यांनी पत्रकारांची माफी मागितली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा