बांधकाम व्यावसायिक केतन अगरवाल याचा होणाऱ्या पत्नीने जीव घेतला. पण त्याआधी केतन अगरवाल याने आपल्या वडिलांकडे सिया गोयल हिची तक्रार केली होती. ती तक्रार वडिलांनी मनावर घेतली असती तर आज तो जिवंत असता, असं FIR मधील वडिलांच्या जबाबातून स्पष्ट होत आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
बंडू येवले, पुणे : पुण्यातील लोहगड येथील केतन अगरवाल हत्या प्रकरणाची FIR कॉपी आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’च्या हाती आली आहे. या FIR मध्ये केतन अगरवाल याचे वडील विशाल अगरवाल यांनी आपल्या जाबाबात काय माहिती दिली आहे, याबाबत सविस्तर माहिती समोर आली आहे. सिया ही सारखी फोनवर व्यस्त असायची. तिचा मित्र चेतन चौधरी याच्याबद्दल सारखी बोलायची. तसेच छोट्या-छोट्या गोष्टींवरुन भांडण करायची. त्यामुळे केतनने आपल्याला सियाची नीट माहिती घेतली आहे ना? असं विचारलं होतं. पण नात्यातील मुलगी असल्याचं मी त्याला सांगायचो, असं केतनच्या वडिलांनी जबाबात म्हटलं आहे.
केतनच्या वडिलांनी काय-काय म्हटलंय?
“माझे चुलत मामा नरेंद्र मित्तल यांनी माझा मुलगा केतन अगरवाल (वय २६ वर्षे) याच्यासाठी त्यांच्या मेहुण्याच्या मुलीचे लग्नासाठी स्थळ सुचवले. ही मुलगी आमच्या नात्यातील असल्याने आम्ही कुटुंबिय मुलगी पाहण्यासाठी गेलो. आम्हाला मुलगी पसंत पडल्याने आम्ही फेब्रुवारी २०२६ मध्ये साखरपुड्याचा कार्यक्रम करण्याच्या ठरवले. त्याप्रमाणे फेब्रुवारी २०२६ मध्ये पुण्यातील रिट्स कारर्टन बंडगार्डन या हॉटेलमध्ये माझा मुलगा केतन आणि सिया गोयल यांचा साखरपुडा करण्यात आला होता”, अशी माहिती केतन अगरवाल याचे वडील विशाल अगरवाल यांनी दिली आहे.
“साखरपुडा झाल्यापासून माझा मुलगा केतन आणि त्याची होणारी पत्नी सिया हे दोघे बाहेर फिरायला जात होते. माझा मुलगा केतन याने माझ्याशी बोलताना तुम्ही सिया गोयल हिची माहिती घेतली आहे का? याबाबत विचारलेले होते. त्यावेळी मी त्याला सांगितले होते की, सिया ही आपल्या नात्यातील मुलगी आहे. तिच्याबद्दल नरेंद्र मामा यांनी आपल्याला खात्री दिली आहे”, असं जबाबात म्हटलं आहे.
4 जूनला लोहगडावर जाण्यास नाकारलं
“30 मे रोजी मुलगा केतन याने सांगितले की, त्यास सिया ही लोहगड किल्यावर फिरायला जायचे म्हणून आग्रह करीत आहे. त्यावर आम्ही देखील केतन आणि सिया यांना लोहगड किल्यावर जाण्यास परवाणगी दिलेली होती. त्यानंतर 31 मे रोजी केतन आणि सिया हे लोहगड येथे जाऊन परत आलेले होते. त्यानंतर 4 जूनला देखील सिया ही केतन यास लोहगड किल्यावर जाण्यासाठी पुन्हा खूप आग्रह करीत होती. पण ते दिनांक 31 मे रोजी लोहगड किल्यावर जावून आल्याने आम्ही त्यांना लोहगड किल्यावर जाण्यास मनाई केलेली होती”, असं केतनच्या वडिलांच्या जबाबात म्हटलं आहे.
पासपोर्ट न मिळाल्याने बालीला जाता आले नाही
“आम्ही केतन आणि सिया यांचे लग्नाचे प्रि वेडींग शुटींगसाठी बाली, इंडोनशीया येथे करण्यासाठी म्हणून दोन महिने आधीच बुकींग केलेली होती. त्यामुळे ०६ जूनला माझी मुलगी संजना, मुलगा केतन, होणारी सून सिया आणि सिया हिचा भाऊ साहिल असे सर्वजण आमच्या राहत्या घरातून मुंबई एअरपोर्ट येथे जाण्यासाठी सर्व तयारी करून निघालेले होते. ते मुंबई एअरपोर्ट येथे पोहचल्यानंतर माझा मुलगा केतन याचा पासपोर्ट बॅगमध्ये मिळाला नाही. त्यामुळे त्यांना बाली इंडोनेशिया येथे जाता आले नाही”, असं वडिलांनी स्पष्ट केलं.
‘केतनच्या बोलण्याकडे लक्ष दिले नव्हते’, वडिलांचा जबाब
“मुंबई एअरपोर्ट येथून घरी आल्यानंतर माझा मुलगा केतन याने मला सांगितले की, ‘सिया ही गेल्या एक महिन्यापासून वेगवेगळ्या किरकोळ कारणावरून माझ्यासोबत भांडण करीत आहे. त्यावर मी केतन यास सियाचे वय लहान असल्याने ती तशी वागत असेल. आपण तिला समजावून सांगू’ असे म्हणून केतनच्या बोलण्याकडे जास्त लक्ष दिलेले नव्हते”, असं वडिलांनी जबाबात म्हटलं आहे.
‘लोहगडावर जाऊ दिलं नाही म्हणून सियाने पडून आकांडतांडव केला’
“१४ जूनला केतन याने आम्हाला सांगितले की, ४ जूनला आपण सियाला आणि मला लोहगड किल्यावर जाऊ दिले नाही. त्यामुळे सियाने रडून-रडून आकांड तांडव करून मला खूप त्रास दिलेला आहे. ती आज देखील मला लोहगड किल्यावर चल असे म्हणत आहे. त्यामुळे आम्हाला लोहगड किल्यावर जाऊ द्या, अशी विनंती केल्याने आम्ही केतन आणि सिया यांना लोहगड येथे जाण्यास नाईलाजाने परवाणगी दिलेली होती. तेव्हा देखील ते दोघे लोहगड किल्यावर जाऊन आलेले होते”, असं केतनच्या वडिलांनी जबाबात म्हटलं आहे.
‘सियाच्या प्रेम प्रकरणाबाबत केतनला संशय होता’
“माझा मुलगा केतन आणि सिया हे दोघे लोहगड येथून फिरून आले होते. त्यानंतर केतन याने मला पुन्हा विचारणा केली की, तुम्ही सियाबाबत संपूर्ण माहिती घेतली आहे का? तिला फोन केल्यानंतर तिचा फोन वारंवार व्यस्त लागतो व ती माझ्यासोबत असताना नेहमी तिचा मित्र चेतन चौधरी याचे नाव घेत असते. तिचे बाहेर काहीतरी प्रेमसंबंध असेल, असे सांगितल्यावर मी, माझी मुलगी संजना आणि माझा लहान भाऊ विजय अगरवाल असे आम्ही मुलगा केतन यांस सिया ही आपल्या नात्यातील असल्याने तसे काही नसेल असे सांगून त्याची समजूत काढली होती”, असं केतन अगरवाल यांनी जबाबात म्हटलं आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा