पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने आयोजिक केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्षांनी याबाबत एक पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारकडून परंपरेनुसार चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. राज्य सरकारकडून चहापानाच्या कार्यक्रमाचं विरोधकांना निमंत्रण देण्यात आलं. पण नेहमीप्रमाणे विरोधकांनी चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याउलट महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून भूमिका मांडण्यात आली आहे. शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहीण योजनेत अपात्र करण्यात आलेला महिलांचा मुद्दा ते नीट परीक्षा घोटाळा, विरोधी पक्षनेते पदाची नियुक्ती अशा विविध मुद्दे या पत्रात करण्यात आली आहेत. तसेच महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाकडून संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी राज्य सरकारवर सडकून टीका करण्यात आली.
काँग्रेस नेते सतेज पाटील काय म्हणाले?
“आम्ही प्रत्येक मुद्द्यांवरुन सरकारला धारेवर धरु. मंत्र्यांमधील वाद आम्ही बघतोय. त्यांच्यातला वाद सभागृहातही येतोय की काय? असं वाटतंय. साडेनऊ लाख कोटींचं कर्ज महाराष्ट्रावर आहे. प्रत्येक माणसावर 70 ते 80 हजार रुपयांचं कर्ज आलं आहे. अर्थव्यवस्था पूर्ण कोलमडली आहे. अशा परिस्थितीत ज्यांना कारभार करायला जमत नाही त्यांच्याबरोबर चहा पिणं हे आम्हाला योग्य वाटत नाही, अशी आमची भूमिका आहे”, असं सतेज पाटील म्हणाले.
जयंत पाटील काय म्हणाले?
“आम्ही चहापानावर बहिष्कार घातला. त्याची काही कारणे सतेज पाटील आणि भास्कर जाधव यांनी सांगितलं. जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नाही. खरिप हंगामाच्या पेरण्या खोळंबलेल्या आहेत. आशेने ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्याने पेरणी केली तिथे बियाणं वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक, जळगाव, धुळे, सोलापूर, सातारा, पुणे, सांगली, सातारा या सर्व ठिकाणी केळी आणि बागायतदारांचं प्रचंड नुकसान झालं आहे. द्राक्ष, पेरु, डाळिंब या फळबागांचं नुकसान होऊन सरकारने मदत जाहीर केलेली नाही. कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत”, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी मांडली.
“पाण्याच्या नियोजनाकडे सरकारचं लक्ष नाही. यामुळे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आणि पिण्याचा पाण्याचा पुरवठा अपुरा झाल्यावर नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागणार आहे. भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं आहे. जलजीवन मिशन असेल किंवा रस्त्याचे कामे असतील, लाखभर कोटींचे बिलं सरकारने दिले नाहीत”, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
भास्कर जाधव काय म्हणाले?
“विरोधी पक्षनेते पद घटनात्मक पद आहे. विरोधी पक्षाला त्याचं मतच मांडू दिलं जात नाही. विरोधी पक्षनेतेपद दिलं तर त्यांना तसं करता येणार नाही. कारण ते घटनात्मक पद आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री हे घटनात्मक पद नाही. विरोधी पक्षनेतेपद घटनात्मक आहे. त्या अधिकाराचा वापर विरोधी पक्षांनी केला तर आपली अनेक पापं बाहेर येतील, अशी भीती सत्ताधाऱ्यांना वाटते”, असा घणाघात ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा