येत्या 24 जून ते 26 जून या कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनस येथे विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे निवडक मेल आणि एक्सप्रेस गाड्यांची सेवा निर्धारित स्थानकाआधीच शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहे आणि वेळापत्रकातही बदल करण्यात येणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस येथे सुविधांच्या विस्तारासाठी 24 जून (बुधवार) ते दिनांक 26 जून (शुक्रवार) या कालावधीत 56 तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेणार आहे. या कामांमध्ये शंटिंग नेकचे बांधकाम, ‘सिक साइडिंग’मध्ये बदल, देखभाल साइडिंग यार्ड, देखभाल साइडिंग क्र. 6, 7, 8 आणि 9 मधील ‘पिट लाइन्स’चा विस्तार, तसेच पाणीपुरवठा वाहिनी, ड्रेनेज आणि पावसाळी पाण्याचा निचरा करणाऱ्या वाहिनीचे वळण बदलणे यांसारख्या कामांचा समावेश आहे. पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हे देखभाल ब्लॉक आवश्यक आहेत. यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगिर आहे, असं मध्य रेल्वेने प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.
ब्लॉकची तारीख आणि कालावधी:
लोकमान्य टिळकर टर्मिनसवर 24 जूनला (बुधवार) रोजी सकाळी 8 वाजल्यापासून ते 26 जून (शुक्रवार) दुपारी 4 वाजेपर्यंत असा 46 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे अनेक एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
ब्लॉकमुळे परिणाम होणाऱ्या लाइन्स:
या ब्लॉकमुळे पहिल्या 8 तासांसाठी ‘सिक कलेक्शन लाइन’ आणि वॉशिंग पिट लाइन क्र. 6, 7 आणि 8 यांच्यावर परिणाम होईल; आणि पुढील 48 तासांसाठी वॉशिंग पिट लाइन क्र. 7 आणि 8 यांच्यावर परिणाम होईल.
24 जूनला चालविण्यात येणाऱ्या मेल आणि एक्सप्रेस गाड्यांवर होणारा परिणाम :
23 जूनला प्रवास सुरू करणाऱ्या खालील गाड्यांची सेवा ठाणे स्थानकावरच शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल. याचाच अर्थ या गाड्यांचे शेवटचे स्थानक ठाणे स्टेशन राहील.
गाडी क्रमांक 12620 मंगळुरू सेंट्रल – लोकमान्य टिळक टर्मिनस मत्स्यगंधा एक्सप्रेस
गाडी क्रमांक 22180 चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
गाडी क्रमांक 16346 तिरुवनंतपुरम – लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस आणि
गाडी क्रमांक 15018 गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
24 जून मेल आणि एक्सप्रेस सेवांच्या वेळापत्रकात बदल
24 जूनला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री 11:35 वाजता सुटणारी गाडी क्रमांक 12141 लोकमान्य टिळक टर्मिनस – पाटलिपुत्र एक्सप्रेस आता 25 जूनला पहाटे 03:30 वाजता सुटेल.
25 जूनला चालविण्यात येणाऱ्या मेल आणि एक्सप्रेस सेवांवर होणारा परिणाम
23 जूनला प्रवास सुरू करणाऱ्या खालील गाडी ठाणे स्थानकावरच शॉर्ट टर्मिनेट करण्यात येतील: गाडी क्रमांक 22537 गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस कुशीनगर एक्सप्रेस 24 जूनला प्रवास सुरू करणाऱ्या खालील गाड्या ठाणे स्थानकावरच शॉर्ट टर्मिनेट करण्यात येतील:
गाडी क्रमांक 12620 मंगळुरू सेंट्रल – लोकमान्य टिळक टर्मिनस मत्स्यगंधा एक्सप्रेस
गाडी क्रमांक 16346 तिरुवनंतपुरम – लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस आणि
गाडी क्रमांक 15018 गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
गाडी क्रमांक 22110 बल्हारशाह – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
गाडी क्रमांक 22112 अयोध्या कैंट – लोकमान्य टिळक टर्मिनस अमृत भारत एक्सप्रेस.
25 जूनला मेल आणि एक्सप्रेस सेवांच्या वेळापत्रकात बदल
25 जूनला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ००:५० वाजता सुटणारी गाडी क्रमांक 22115 लोकमान्य टिळक टर्मिनस – करमळी वातानुकुलीत एक्सप्रेस आता दिनांक 25 जूनला ०३:१५ वाजता सुटेल.
25 जूनला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २२:४५ वाजता सुटणारी गाडी क्रमांक 12167 लोकमान्य टिळक टर्मिनस – बनारस एक्सप्रेस आता 26 जूनला ०३:३० वाजता सुटेल.
25 जूनला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २३:३५ वाजता सुटणारी गाडी क्रमांक 12141 लोकमान्य टिळक टर्मिनस – पाटलिपुत्र एक्सप्रेस आता 26 जूनला ०३:४५ वाजता सुटेल.
26 जूनला चालविण्यात येणाऱ्या मेल आणि एक्सप्रेस गाड्यांवर होणारा परिणाम
24 जूनला प्रवास सुरू करणाऱ्या खालील गाड्या ठाणे स्थानकावरच शॉर्ट टर्मिनेट करण्यात येतील:
गाडी क्रमांक 22537 गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस कुशीनगर एक्सप्रेस आणि
गाडी क्रमांक 22358 गया – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
25 जूनला प्रवास सुरू करणाऱ्या खालील गाड्या ठाणे स्थानकावरच शॉर्ट टर्मिनेट करण्यात येतील:
गाडी क्रमांक 12620 मंगळुरू सेंट्रल – लोकमान्य टिळक टर्मिनस मत्स्यगंधा एक्सप्रेस
गाडी क्रमांक 16346 तिरुवनंतपुरम – लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस आणि
गाडी क्रमांक 12880 भुवनेश्वर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
25 जूनला मेल आणि एक्सप्रेस सेवांच्या वेळापत्रकात बदल
26 जूनला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ००:४५ वाजता सुटणारी गाडी क्रमांक 11099 लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव एक्सप्रेस आता दिनांक 25 जूनला ०३:३० वाजता सुटेल.
25 जूनला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १०:३० वाजता सुटणारी गाडी क्रमांक 01143 लोकमान्य टिळक टर्मिनस – दानापूर एक्सप्रेस आता 26 जूनला १३:३० वाजता सुटेल.
26 जूनला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २०:३५ वाजता सुटणारी गाडी क्रमांक 12101 लोकमान्य टिळक टर्मिनस – शालीमार एक्सप्रेस आता 26 जूनला २१:३५ वाजता सुटेल.
26 जूनला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २२:४५ वाजता सुटणारी गाडी क्रमांक 12167 लोकमान्य टिळक टर्मिनस – बनारस एक्सप्रेस आता 27 जूनला ०३:०० वाजता सुटेल.
26 जूनला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २३:३५ वाजता सुटणारी गाडी क्रमांक 12141 लोकमान्य टिळक टर्मिनस – पाटलिपुत्र एक्सप्रेस आता दिनांक 27 जूनला ०३:१५ वाजता सुटेल.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा