Sejal Pawar on Pranit More Show : सेजल पवार सारख्या लोकांनी केलेल्या वक्तव्यांमुळे संपूर्ण डॉक्टर समुदायाची प्रतिमा खराब होते, असेही डॉ. स्वप्नील केंद्रे यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.
वैद्यकीय क्षेत्रात खळबळ
संबंधित कॉमेडी शोमध्ये एका वैद्यकीय विद्यार्थिनीने मृत शरीराच्या अवयवांविषयी अतिशय खालच्या पातळीवर केलेल्या वक्तव्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्याचे पडसाद समाज माध्यमे आणि प्रसार माध्यमांमध्ये उमटत आहेत. इतर वैद्यकीय विद्यार्थीही या विषयी बोलते झाले आहेत. सेंट्रल मार्डचे माजी अध्यक्ष व ‘फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन’चे सह अध्यक्ष डॉ. स्वप्नील केंद्रे म्हणाले, मृत शरीराचा अभ्यास करुनच समस्त वैद्यकीय विद्यार्थी हे डॉक्टर होतात व जीवन वाचवण्याचे कौशल्य शिकतात. अशाच वैद्यकीय शिक्षणासाठी संबंधित कुटुंबियांनी मोठ्या विश्वासाने व मानवतेच्या भावनेतून मृत शरीराचे दान केले असते. अशा मृत शरीराविषयी हलकेपणाने, खाजगी अवयवांबाबत थिल्लर विनोद करणे हे पूर्णपणे अयोग्य तसेच मृत व्यक्तींच्या गरिमेचा आणि दानकर्त्यांच्या भावनांचा अवमान आहे.
रुग्णांची गोपनीयता राखणे, त्यांचा आदर करणे आणि त्याचवेळी मृतदेहांचाही आदर राखणे, हे डॉक्टरांचे कर्तव्य आहे व समस्त डॉक्टरांकडून हे कर्तव्यपालन होते. मात्र अशा वक्तव्यांमुळे संपूर्ण डॉक्टर समुदायाची प्रतिमा खराब होते, असेही डॉ. केंद्रे यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.
Delhi Fire : दिल्लीतील इमारतीत आग लागली नाही, लावली! CCTV मध्ये भयंकर उलगडा, स्कूटर जाळण्याच्या नादात तीन जीव गेले
शरीराचा पूर्ण सन्मान राखण्याचे शिक्षण
खरे म्हणजे मृत शरीराचा सन्मान राखणे, याच पहिल्या शिकवणीपासून वैद्यकीय शिक्षणाला सुरुवात होते, असे सांगताना ‘महाराष्ट्र सिनिअर रेसिडेन्ट डॉक्टर असोसिएशन’चे माजी अध्यक्ष व प्रमुख सल्लागार डॉ. अभिजित हेलगे म्हणाले, आम्हाला पहिले दहा दिवस मृत शरीराचा पूर्ण सन्मान राखत मृत शरीराच्या माध्यमातून खरे वैद्यकीय शिक्षण सुरू होते. त्यामुळेच शरीररचनाशास्त्र (ॲनाटॉमी) हा वैद्यकीय शिक्षणाचा मूलभूत विषय आहे, ज्याच्या आधारावर संपूर्ण वैद्यकीय शिक्षण अवलंबून आहे. साहजिकच या विषयाचे अनन्यसाधारण महत्त्व प्रत्येक डॉक्टरला मान्य आहे, असेही डॉ. हेलगे म्हणाले.
आंदोलन मागे, तरी फडणवीस सरकारला घाम फोडला! कर्जमाफीसाठी रोहित पवार ठाम
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अभ्यासक्रमांतर्गत ‘एटकॉम’ म्हणजेच ॲटिट्यूड, एथिक्स अँड कम्युनिकेशन मॉड्यूलद्वारे विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये, संवेदनशीलता आणि देहदात्यांविषयी आदरभाव विकसित करण्यावर विशेष भर दिला जातो. तसेच महाविद्यालयात विद्यार्थ्यांना देहदानाचे महत्त्व, वैद्यकीय शिक्षणातील त्याची अनन्यसाधारण भूमिका आणि समाजासाठी त्याचे अमूल्य योगदान याबाबत नियमित मार्गदर्शन केले जाते.
Solapur Accident : लहान बाळ बुडताना दिसलं, मागचा पुढचा विचार न करता विहिरीत उडी घेतली, इरफानने सांगितला अपघातानंतरचा थरार
देहदाता सन्मान शपथ
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) दरवर्षी देहदाता सन्मान शपथ (कॅडेव्हेरिक ओथ) तसेच देहदात्यांच्या नातेवाईकांचा सन्मान समारंभ आयोजित करून दात्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. मात्र बेजबाबदार विधाने, चुकीच्या प्रतिक्रिया आणि देहदान प्रक्रियेबाबत अनादराची प्रवृत्ती, यामुळे देहदानासारख्या समाजोपयोगी आणि मानव कल्याणकारी चळवळीच्या गतीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते. अशा विधानांमुळे केवळ समाजात गैरसमज निर्माण होत नाहीत, तर देहदानासारख्या उदात्त, समाजोपयोगी आणि वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यावश्यक चळवळीलाही धक्का पोहोचू शकतो, अशी चिंता घाटीतील शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. अर्चना कल्याणकर यांनी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केली.
