• Sun. Jun 21st, 2026

    Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA कडून राज्यभरात धाडी, पण भाजप आमदाराचा वेगळाच सवाल; प्रशासनाला धरलं धारेवर

    Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA कडून राज्यभरात धाडी, पण भाजप आमदाराचा वेगळाच सवाल; प्रशासनाला धरलं धारेवर

    अहिल्यानगर: आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून राज्यभरात भेसळयुक्त खाद्यपदार्थ्यांविरोधात धाडसत्र सुरू आहे. या कारवाईचं सर्वच स्तरातून स्वागत होत असताना सत्ताधारी भाजपचे आमदार विक्रम सातपुते यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. FDA कडून केल्या जाणाऱ्या कारवाईबाबत बोलताना पाचपुतेंनी प्रशासनाच्या सातत्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मार्च २०२५ मध्ये विधानसभेत अनलॉग चीज आणि पनीरचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर राज्यभर कारवाया सुरू झाल्या. त्यानंतर जुलै २०२५ च्या अधिवेशनात पुन्हा हा विषय मांडताच प्रशासनाचा वेग वाढला. कृत्रिम फुलांच्या विक्रीबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतरही अशाच प्रकारे कारवाया झाल्या. त्यामुळे FDAच्या धाडी आणि तपासण्या या केवळ अधिवेशनाच्या तोंडावरच का दिसतात, असा सवाल सातपुते यांनी विचारला आहे.

    पुढे बोलताना विक्रम सातपुते म्हणाले की, “FDAच्या कारवाईचे स्वागत आहे; मात्र या कारवाया वर्षभर सातत्याने झाल्या पाहिजेत. अधिवेशन आले की धाडी आणि अधिवेशन संपले की शांतता, अशी परिस्थिती योग्य नाही,” असे सांगत पाचपुतेंनी प्रशासनाला आरसा दाखवला.

    एकीकडे खंडोबाच्या भंडाऱ्याच्या शुद्धतेचा प्रश्न आणि दुसरीकडे FDAच्या कारवायांतील सातत्याचा मुद्दा अशा दुहेरी आघाडीवर पाचपुतेंनी प्रशासनाला घेरल्याने राज्यातील अन्नसुरक्षा आणि धार्मिक श्रद्धेशी संबंधित विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. आता प्रशासन यावर नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे भाविकांसह सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.

    खंडोबाच्या भंडाऱ्याच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह

    खंडोबा भक्तांच्या श्रद्धेचा विषय असलेल्या भंडाऱ्याच्या शुद्धतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी अन्न व औषध प्रशासनाला गेल्या काही दिवसांपासून धारेवर धरलं आहे. जेजुरी, पालीसह राज्यातील विविध खंडोबा देवस्थानांमध्ये उधळला जाणारा भंडारा हा खरोखर शुद्ध हळदीचा आहे की त्यात कॉर्न स्टार्चसारख्या घटकांचे मिश्रण केले जाते, याची चौकशी करून भंडाऱ्याची कायदेशीर व्याख्या निश्चित करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

    दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांची काही दिवसांपूर्वी भेट घेत विक्रम पाचपुते यांनी भंडाऱ्याबाबत स्पष्ट नियमावली तयार करण्याची मागणी केली. खंडोबा देवस्थानांमध्ये उधळला जाणारा भंडारा हा शुद्ध पिवळ्या हळदीचाच असावा, अशी भाविकांची अपेक्षा असते. मात्र सध्या भंडाऱ्याची कोणतीही अधिकृत किंवा कायदेशीर व्याख्या नसल्याने काही उत्पादक त्याचा गैरफायदा घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. भंडारा म्हणून विकल्या जाणाऱ्या हळदीच्या पॅकेटवर कॉर्न स्टार्चचा उल्लेख केला जात असल्याचे निदर्शनास आणून देत, हा पदार्थ पारंपरिक भंडाऱ्याचा भाग कसा असू शकतो, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *