Nashik News: सारूळ परिसरातील बहुतांश अधिकृत उत्खनन सध्या ठप्प झाले आहे. त्या कारवाईने आता अवैध उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
अधिक माहिती अशी की, तहसीलदार पंकज पवार यांच्या आदेशानुसार १७ एप्रिल रोजी महसूल विभागाच्या पथकाने १६ नोंदणीकृत खानपट्ट्यांची तपासणी केली. या पाहणीत १२ खानपट्ट्यांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या. खान क्षेत्राचे सीमांकन न करणे, सुरक्षा कुंपण नसणे, अनियंत्रित उत्खनन करणे, धूळ नियंत्रणासाठी पाणी फवारणीसारख्या उपाययोजना न करणे, हरित पट्टा व वृक्षारोपणाच्या अटींचे पालन न करणे, बेंच निर्मितीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे तसेच उत्खनन व वाहतुकीच्या नोंदी अद्ययावत न ठेवणे अशा अनेक बाबी निदर्शनास आल्या.
Nashik Crime: आदिवासी मुली विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; हरसूलमधील अल्पवयीन मुलीची अहिल्यानगरात विक्री, 10 जण ताब्यात
काही ठिकाणी वैज्ञानिक पद्धतीऐवजी धोकादायक स्वरूपात उत्खनन सुरू असल्याचेही तपासणीत स्पष्ट झाले. त्यामुळे पर्यावरणीय हानीबरोबरच सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला होता. विशेषतः हरित पट्टा विकसित करण्याच्या अटींचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन झाल्याचे आढळून आले.
संबंधित खानपट्टेधारकांना नोटिसा बजावल्यानंतर मे महिन्यात त्यांच्या परवान्यांचे निलंबन करण्यात आले. दरम्यान आठ जून रोजी मंडळ अधिकारी राहुल काळे व ग्राममहसूल अधिकारी अरुण फसाळे यांनी बंद करण्यात आलेल्या खानपट्ट्यांकडे जाणारे रस्ते दगड-माती टाकून बंद केले आहेत. पुढील आदेशापर्यंत येथे उत्खननास बंदी राहणार आहे.
धोंडे जेवण करुन फिरायला गेले अन् आक्रित घडलं; गंगापूर धरणात बुडून चार भावंडांचा करुण अंत, नाशिक हळहळलं!
खाणपट्टे बंद करण्यात आल्यानंतर अवैध उत्खनन टाळण्यासाठी महसूल विभागाचे गस्ती पथक नियमित गस्त घालणार आहे. बंदी आदेशाचे उल्लंघन करून उत्खनन सुरू असल्याचे आढळल्यास संबंधितांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात येतील.-राहुल काळे, मंडळ अधिकारी, महसूल विभाग
