ST Bus Employees Increase DA Allowance : एसटी बस परिवहन महामंडळाने चालक आणि वाहक यांना दणका दिला आहे. प्रशासनाने सांगितलेल्या हॉटेवर बस न थांबवता दुसऱ्या हॉटेलवर बस थांबवल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
महागाई भत्ता आणि घरभाडे भत्त्यात वाढ
मुंबई सेंट्रल येथील ‘वाहतूक भवन’ येथे महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत त्यांनी बैठक घेतली. यावेळी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या आर्थिक आणि प्रशासकीय मागण्यांवर चर्चा झाली. त्या वेळी सरनाईक यांनी महागाई भत्ता आणि घरभाडे भत्त्यात वाढ करण्याचे घोषित केले. भविष्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू होताच तो तत्काळ प्रभावाने एसटी कर्मचाऱ्यांनाही लागू करण्याचे निर्देश प्रशासनाला देताना सरनाईक यांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीची थकबाकीही आर्थिक परिस्थितीचा विचार करून टप्प्याटप्प्याने अदा केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. त्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांची बैठक आयोजित करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. बैठकीत कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, सेवाशर्ती, रिक्त पदभरती, बसस्थानक विकास, कल्याणकारी योजना; तसेच महामंडळाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासंदर्भातील विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.
Weather Update: मुंबईत १० वर्षांमधील सर्वाधिक तापमान, पुण्यातही पावसाचं आगमन लांबणीवरच; अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
मोहीम अधिक तीव्र करण्यात येईल
‘बसस्थानक परिसरातील अवैध वाहतुकीवर कठोर कारवाईसाठी एसटीच्या मुख्य सुरक्षा आणि दक्षता अधिकारी प्रियांका नारनवरे यांच्या नेतृत्वाखाली धडक मोहीम राज्यभर राबवण्यात येत आहे. त्याचा चांगला परिणाम एसटीच्या उत्पन्न वाढीवर झाला असून, ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येईल’, असं परिवहनमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले आहेत.
नेमून दिलेल्या हॉटेलांवर एसटी न थांबल्यास दंड
दरम्यान, एसटीच्या भरारी पथकाने महामार्गावरील एसटी महामंडळाने नेमून न दिलेल्या हॉटेलांवर बस उभ्या करणाऱ्या १३१ बसवर कारवाई केली आहे. दोन महिन्यांत केलेल्या या कारवाईतील एसटी बस राज्याच्या विविध भागांतील आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून कर्मचाऱ्यांच्या पगारातून पैसे वसूल केले जाणार आहेत.
Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांची ‘दादा’ स्टाइल; राष्ट्रवादीतील दिग्गजांना स्टेजवरूनच फटकारलं, नाव न घेता बरंच काही बोलून गेल्या!
चालकांवर कारवाईचा इशारा
एसटीचालक महामार्गावर कोणत्याही हॉटेलवर थांबून फक्त स्वतःचाच फायदा पाहत होते. हॉटेल चालकाकडून प्रवाशांची लुटमार करण्यात येत होती. अशा तक्रारी वाढल्यानंतर एसटी प्रशासनाने प्रत्येक मार्गावर अधिकृत हॉटेलची नेमणूक केली. त्यांना प्रवाशांकडून नाश्ता, जेवणासाठीचे दर निश्चित करून दिले; तसेच त्या ठिकाणी स्वच्छता व्यवस्थित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परवानगी नसलेल्या हॉटेलवर बस उभ्या करणाऱ्या चालकांवर कारवाईचा इशारा दिला होता. तरीही चालकांकडून फायद्यासाठी परवानगी नसलेल्या हॉटेलवर बस उभ्या केल्या जात आहेत. अशा बसवर भरारी पथकामार्फत कारवाई करण्यात येत आहे. त्यासाठी पुणे विभागाची सहा पथके कार्यरत आहेत.
