CJP Abhijeet Dipke: शनिवारपर्यंत शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा न झाल्यास दिल्लीत देशव्यापी आंदोलन छेडणार असल्याचेही दीपके यांनी सांगितले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात ‘सीजेपी’च्या वतीने आंदोलनाची हाक देण्यात आली होती. आंदोलनात पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी, ॲड. असिम सरोदे, राहुल डंबाळे यांच्यासह विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.
VIDEO | कॉकरोच जनता पार्टीचा एल्गार ,पुण्यातून दीपकेंचा थेट इशारा
दीपके म्हणाले, ‘गेल्या बारा वर्षांपासून भारतात ‘हिंदु-मुस्लिम’ या विषयावर राजकारण केले जात आहे. धार्मिक धुर्वीकरणातून रोजगार, महागाई, शिक्षण असे प्रश्नच नागरिकांना पडू नयेत, अशी सत्ताधाऱ्यांची इच्छा आहे. जग हे ‘एआय’, क्वांटम कॉम्युटिंग, सेमीकंडक्टरकडे जात असताना भारतात हिंदू-मुस्लिम केले जात आहेत. देशाची व्यवस्था सडली असल्याने कॉकरोच एकत्रित आले असून, ती नीट करण्यासाठी कॉकरोचची गरज आहे.’
‘माध्यमस्वातंत्र्यावर बोलावे’
‘पंतप्रधानांनी ‘मन की बात’मध्ये माध्यम स्वातंत्र्यावर बोलले पाहिजे. कोणत्याही सरकारच्या विरोधात आमचे आंदोलन नाही. कोणत्याही प्रश्नाला उत्तर देणारे सरकार आपल्याला हवे आहे. सत्य आणि अहिंसा हाच आमच्या आंदोलनाचा मार्ग आहे.’, अशी अपेक्षा वांगचुक यांनी व्यक्त केली.
विधान परिषद निवडणुकीत ‘मॅचफिक्सिंग’? पुणे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अरविंद शिंदेंचा आरोप
मुख्यमंत्र्यांना टोला
‘आंदोलनात सहभागी झालेले लोक समाजात अराजक पसरवत आहेत, असे मुख्यमंत्री म्हणतात. मला त्यांना विचारायचे आहे, की हक्कासाठी लढणे व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेणे म्हणजे अराजक पसरवणे आहे का? आम्हाला राज्यघटना माहीत आहे का, असेही ते विचारतात. मात्र, चोरून पहाटेचा शपथविधी पार पाडणे कोणत्या राज्यघटनेत लिहिले आहे,’ असा टोलाही दीपके यांनी लगावला.
आंदोलकांच्या प्रमुख मागण्या
-पेपरफुटी झाल्यास विद्यार्थ्यांना आर्थिक मदत म्हणून १० हजारांची भरपाई
-भरती प्रक्रियेदरम्यान विशेष गाड्यांची व्यवस्था
-पेपरफुटीनंतर ७२ तासांच्या आत पर्यायी परीक्षेची तारीख जाहीर करणे
-उत्तरपत्रिका प्रत्यक्ष तपासणी आणि टेंडर घेणाऱ्या परीक्षा व्यवस्थेचे स्वतंत्र ऑडिट
