Nashik Nivruttinath Silver Palkhi : ‘नाथांच्या रथावर एक क्विंटलपेक्षा जास्त चांदी आहे. पालखी व पादुकाही चांदीच्या आहेत. अनुचित प्रकार टाळण्यासाठी यंदा दरवर्षीपेक्षा कडेकोट पोलिस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे’, असं संत निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष राहुल साळुंखे यांनी म्हटलं आहे.
त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे प्रस्थान
श्री क्षेत्र पंढरपूर येथील आषाढी वारीनिमित्त संत निवृत्तिनाथ महाराज संस्थानच्या वतीने निघणाऱ्या मानाच्या पालखी सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या २९ जून रोजी पालखी त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. यंदा सोहळ्याचे मुख्य आकर्षण असलेला चांदीचा रथ आणि मार्गातील रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेता, प्रशासकीय पातळीवर जय्यत तयारी सुरू आहे. मुख्य रथ सागवान लाकडाचा असून त्यावर चांदीचे नक्षीकाम करण्यात आले आहे. चांदीच्या वाढत्या दरांमुळे या रथाची किंमत चार ते पाच कोटी रुपयांच्या घरात आहे. यंदा व्ही. एन. नाईक संस्थेच्या वतीने या ऐतिहासिक रथाची विशेष डागडुजी आणि दुरुस्ती करण्यात आली आहे.
Midi Electric AC Bus : बेस्ट प्रशासनाचा मोठा निर्णय; मुंबईत येणार 1,500 मिडी एसी बस, जाणून घ्या कुठून कुठे धावणार?
गतवर्षीचे काही अनुभव लक्षात घेता संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी यंदा रथाच्या सुरक्षेसाठी थेट पोलिसांना साकडे घातले आहे. या मौल्यवान रथाच्या रक्षणासाठी साध्या वेशातील आणि गणवेशातील पोलिस कर्मचारी, महिला पोलिस तसेच कमांडो तैनात करावेत, अशी मागणी संस्थानच्या माध्यमातून करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर पालखी मार्गावर रथ ज्या ठिकाणी मुक्कामी असेल, तिथे पोलिसांची एक स्वतंत्र तुकडी २४ तास तैनात राहणार आहे. रथाच्या पुढे आणि मागे पोलिसांचे वाहन व कर्मचाऱ्यांचा ताफा असेल, जेणेकरून गर्दीचे नियोजन योग्य प्रकारे करता येईल.
रस्ते खोदकामाचे आव्हान
यंदा पालखी सोहळ्यासमोर रस्त्यांचे मोठे आव्हान आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर ते नाशिक दरम्यानचे रस्ते विकासकामांसाठी खोदण्यात आले आहेत. या खराब रस्त्यांमधून रथ आणि पालखी सुरक्षितपणे पुढे नेणे हे संस्थान आणि प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक शाखेची विशेष मदत घेतली जाणार आहे. यासोबतच, पालखी ज्या भागात मुक्कामी असेल किंवा ज्या मार्गावरून जाईल, त्या परिसरातील सर्व मांसाहाराची दुकाने आणि दारूची दुकाने बंद ठेवावीत, अशी मागणी संस्थानने केली आहे.
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचा हंटर! एकाच वेळी ७ जिल्ह्यांमध्ये छापेमारी; कोट्यवधींचे भेसळयुक्त तूप, खाद्यतेल, पनीर जप्त, कुठे-कुठे कारवाई?
रथाचे वैशिष्ट्ये काय?
आजच्या बाजारभावानुसार रथावरील चांदीची किंमत चार ते पाच कोटी
रथ सुरक्षेसाठी साध्या वेशातील, गणवेशातील पोलिस आणि कमांडो
मुक्कामाच्या ठिकाणी पोलिसांची विशेष तुकडी तैनात
रथावर राहणार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच
