• Wed. Sep 16th, 2026
Maharashtra Live News 11th June 2026 : दिवसभरातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

विधान परिषद निवडणुकीत ‘मॅचफिक्सिंग’? पुणे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अरविंद शिंदेंचा आरोप

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराने ऐन वेळी घेतलेली माघार ही पक्षहितासाठी नव्हे, तर पूर्वनियोजित ‘मॅचफिक्सिंग’चा भाग असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी बुधवारी केला. प्रदेश नेतृत्वाची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात असल्याचा दावा करून त्यांनी थेट लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed