• Fri. Jun 12th, 2026
    Sikandar Shaikh Thar Accident : वाहनावरील नियंत्रण सुटलं, महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखच्या गाडीचा अपघात; बक्षिसात मिळालेल्या थारची भीषण अवस्था

    Pailwan Sikandar Sheikh Thar Car Accident : सिकंदर शेखच्या थार गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. सुदैवाने या मोठ्या अपघातातून पैलवान सिकंदर शेख थोडक्यात बचावला आहे.

    सिकंदर शेख थार अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : सांगली जिल्ह्यातील सांगोल्यामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध पैलवान, महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी विजेता सिकंदर शेख याच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या बॉर्डरवर हा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भयंकर होता की सिकंदर शेखच्या याच्या थार गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. सुदैवाने या मोठ्या अपघातातून पैलवान सिकंदर शेख थोडक्यात बचावला आहे.

    अपघात नेमका कसा झाला?

    या अपघाताबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर सांगोला-मिरज मार्गावर आज एक मोठा भीषण अपघात झाला. प्रसिद्ध कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याच्या कारचा भीषण अपघात झाला असून, सुदैवाने या अपघातात तो बालंबाल बचावला आहे. या अपघातात गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मात्र, सिकंदर शेख याला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही, अशी माहिती समोर येत आहे. विशेष बाब म्हणजे, ज्या थार गाडीचा अपघात झाला आहे, ती गाडी सिकंदर शेख याला कुस्ती जिंकल्यानंतर बक्षिस म्हणून मिळाली होती.
    Maharashtra TimesPune Crime: आई आणि बायको मला माझ्याच फ्लॅटमध्ये येऊ देत नाहीत; पुण्यातील ४२ वर्षीय व्यक्ती थेट पोलीस स्टेशनला गेला, नेमकं काय घडलं?

    काही कामानिमित्त बाहेर गेलेला

    सिकंदर शेख हा आपल्या प्रवासानिमित्त सांगोला-मिरज मार्गावरून जात असताना हा अपघात घडला. रस्ता आणि वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की गाडीचा समोरचा आणि बाजूचा भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. अपघाताचं वृत्त समजताच परिसरातील नागरिकांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. दरम्यान, सिकंदर शेख हे महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय नाव आहे. महाराष्ट्रातीलच नव्हेतर देशभरातील प्रसिद्ध मल्लांना आस्मान दाखवत सिकंदर शेख याने कुस्तीच्या मैदानात आपला दबदबा निर्माण केला आहे. सिकंदर शेख याने महाराष्ट्र केसरीसह अनेक मानाच्या स्पर्धा जिंकत कुस्ती क्षेत्रात मोठं नाव कमावलं आहे. दरम्यान, या अपघातानं परिसरात खळबळ उडाली आहे.
    Maharashtra TimesCrime News : निसर्गरम्य डोंगराचा फोटो काढला, झूम करुन पाहताच डोळे विस्फारले, विरारमध्ये 25 वर्षीय तरुणाला झाडावर बॉडी दिसली

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा