• Wed. Jun 10th, 2026
    Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA चं पथक धाड टाकण्यासाठी गेलं; पण कसाबसा वाचला जीव, महिला अधिकाऱ्याला भयंकर अनुभव!

    FDA Raid News: गुंडांनी त्यांची भरधाव स्कॉर्पिओ थेट अधिकाऱ्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. हा जीवघेणा हल्ला पाहून काही अधिकाऱ्यांनी जवळच असलेल्या मंदिराच्या मागे पळून जाऊन स्वतःचा जीव वाचवला.

    तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA चं पथक धाड टाकण्यासाठी गेलं; पण कसाबसा वाचला जीव(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यात गुटखा माफियांची मुजोरी टोकाला पोहोचली आहे. वाळूज परिसरातील रहीमपूर येथे प्रतिबंधित गुटख्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या पथकावर गुटखा माफियांनी जीवघेणा हल्ला केला आहे. महिला अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांच्या अंगावर भरधाव स्कॉर्पिओ घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. एवढेच नव्हे तर, अधिकाऱ्यांना धमकावून आरोपींनी जप्त केलेला गुटख्याचा ट्रक उघडपणे पळवून नेला. या संपूर्ण थराराचा व्हिडिओ समोर आला असून पोलीस दलासह प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे.

    एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कडक निर्देशानंतर, एफडीएच्या पथकाने मंगळवारी ९ जून पहाटे रहीमपूर परिसरात सापळा रचला होता. गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने एका आयशर ट्रकला अडवून त्याची तपासणी केली असता, त्यात तब्बल २५ पोती प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला आढळून आला. हा कोट्यवधींचा माल जप्त करून पथक पोलीस संरक्षणाची वाट पाहत होते. पथक घटनास्थळी असतानाच अचानक एका विनानंबर काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून ५ ते ६ गुंड तिथे धडकले. त्यांनी गाडीतून उतरताच यांना गोळ्या घाला, अशा आरोळ्या ठोकल्या आणि थेट अधिकाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

    महिला अधिकाऱ्याचा थरारक पाठलाग….
    या गुंडांनी महिला अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे यांना लक्ष्य केले. त्यांना धडक देण्यासाठी एका आरोपीने गाडी त्यांच्या अंगावर घातली आणि त्यांचा पाठलाग केला. मात्र, सुरसे यांनी कमालीचे प्रसंगावधान राखत बाजूला उडी मारली आणि त्या बालंबाल वाचल्या. या गोंधळाचा फायदा घेत माफियांच्या साथीदारांनी गुटख्याने भरलेला तो आयशर ट्रक घटनास्थळावरून वेगाने पळवून नेला. सरकारी अधिकाऱ्यांवर झालेल्या या हल्ल्यामुळे पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणि धमकावल्याप्रकरणी गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, पळून गेलेला ट्रक आणि इतर मुख्य फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा