• Sun. Jun 14th, 2026

    ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सूक्ष्म नियोजन करा – पालकमंत्री नितेश राणे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 8, 2026
    ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सूक्ष्म नियोजन करा – पालकमंत्री नितेश राणे – महासंवाद

    सिंधुदुर्गनगरी, दि.  (जिमाका) : ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव‘ या महत्त्वाकांक्षी अभियान सुरू केले आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. या अभियानामुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा मिळणार असून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम, सुदृढ आणि लोकाभिमुख होणार असल्याचा विश्वास व्यक्त करत पालकमंत्री नितेश राणे यांनी सर्व संबंधित यंत्रणांना सूक्ष्म नियोजन करून अभियान यशस्वी करण्याचे निर्देश दिले.

    सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय जिल्हा आरोग्य संपन्न गाव अभियान समितीची बैठक आज मंत्रालयात पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत या अभियानाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

    बैठकीत पालकमंत्री श्री. राणे यांनी ग्रामपंचायतींनी अभियानात नोंदणी करून सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. तसेच गावपातळीवर लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य, आशा सेविका, अंगणवाडी कर्मचारी आणि आरोग्य विभाग यांच्यात प्रभावी समन्वय निर्माण करण्यावर भर देण्याच्या सूचना दिल्या. ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत आरोग्यविषयक सेवा आणि जनजागृती पोहोचविण्यासाठी स्थानिक यंत्रणांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.

    पालकमंत्री श्री. राणे यांनी विविध अभियानांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची सविस्तर पडताळणी करण्याचे निर्देशही दिले. विविध स्तरांवरील कर्मचारी संख्या, त्यांची उपलब्धता, रिक्त पदांची स्थिती तसेच भविष्यातील गरजांचा आढावा घेऊन त्यानुसार नियोजन करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या. आरोग्य सेवा अधिक परिणामकारक करण्यासाठी उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य वापर आणि संसाधनांचे प्रभावी व्यवस्थापन करण्यावरही भर देण्यात आला.

    या बैठकीस सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रतीक उगारे, जल जीवन मिशन प्रकल्प संचालक तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    ००००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed