• Tue. Jun 9th, 2026

    Mumbai News: मुंबईतील 835 बांधकामे बंद, 977 साईट्सना ‘कारणे दाखवा’; धूळ प्रदूषण नियंत्रण नियमावलीकडे दुर्लक्ष भोवले

    Mumbai News: मुंबईतील 835 बांधकामे बंद, 977 साईट्सना ‘कारणे दाखवा’; धूळ प्रदूषण नियंत्रण नियमावलीकडे दुर्लक्ष भोवले

    मुंबई : धूळ प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करणाऱ्या बांधकाम प्रकल्पांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. या अंतर्गत जानेवारी ते जून या कालावधीत ८३५ बांधकामांना कामबंदीच्या नोटिसा बजावण्यात आल्या असून, ९७७ बांधकामांना कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या आहेत.

    मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावल्यानंतर ऑक्टोबर २०२३मध्ये महापालिकेने परिपत्रक जारी करून बांधकामस्थळी प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांची अंमलबजावणी सक्तीची केली होती. मात्र, धूळ प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेवर ताशेरे ओढत कारवाई अधिक कठोर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर महापालिकेने तपासणी आणि अंमलबजावणी मोहीम अधिक तीव्र केली.

    Rajya Sabha Bypoll Election : छगन भुजबळ नाही तर दुसऱ्याच नेत्याला राज्यसभेची उमेदवारी, सुनील तटकरे यांच्याकडून घोषणा
    बांधकाम आणि विकासकामांच्या ठिकाणी निर्धारित २८ मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होत नसल्यास संबंधितांना कारणे दाखवा नोटीस, तसेच कामबंदीची नोटीस बजावली जात आहे. या नियमांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांमध्ये ९६ तपासणी पथके कार्यरत आहेत. मात्र, अनेक बांधकामस्थळी अद्यापही नियमांचे उल्लंघन होत असल्याचे तपासणीतून समोर आले आहे.

    महापालिकेच्या पर्यावरण व हवामान बदल विभागाने तसेच वॉर्डस्तरीय प्रशासनाने मिळून मुंबईतील ३,०९३ बांधकामस्थळांची तपासणी केली आहे. या तपासणीत धूळ नियंत्रणाच्या उपाययोजनांबाबत अनेक त्रुटी आढळून आल्या. त्यानंतर संबंधित प्रकल्पांविरुद्ध कारवाई करण्यात आली.

    Maharashtra TimesMumbai Crime : शरीरात लपवून सोन्याची तस्करी, DRIची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावरुन 5 कोटींचं सोनं जप्त; मोठ्या कर्मचाऱ्यांचा समावेश
    महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे
    -उंच इमारतींच्या बांधकामस्थळी किमान ३५ फूट उंचीचे पत्र्याचे किंवा धातूचे आच्छादन उभारणे बंधनकारक
    -सर्व बांधकामाधीन इमारती चारही बाजूंनी हिरव्या जाळीने अथवा ताडपत्रीने पूर्णपणे झाकणे आवश्यक
    -इमारत पाडकामाच्या वेळी संबंधित संरचना वरपासून खालपर्यंत संपूर्ण झाकलेली असावी
    -राडारोडा, माती आणि धूळ निर्माण करणाऱ्या साहित्यावर नियमित पाण्याची फवारणी करणे बंधनकारक
    -बांधकाम साहित्य वाहून नेणारी सर्व वाहने पूर्ण झाकलेली असावीत
    -ग्राइंडिंग, कटिंग आणि तत्सम कामे बंदिस्त जागेतच करावीत
    -बांधकाम साहित्य वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांकडे वैध प्रदूषण नियंत्रण (पीयूसी) प्रमाणपत्र असणे आवश्यक

    Maharashtra Times‘वडापाव आता वर्तमानपत्रात गुंडाळून विकता येणार नाही’, IAS तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये
    सेन्सरची माहिती
    ऑटो डीसीआर आणि महापालिकेच्या विभागांकडून संकलित माहितीनुसार एकूण बांधकाम स्थळांची संख्या- ३,०९३
    बांधकाम स्थळांवर बसविण्यात आलेल्या सेन्सर-आधारित वायू गुणवत्ता निरीक्षण यंत्रांची संख्या- २,९३८

    दंडाचा प्रस्ताव रखडला
    धूळ प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विकासक आणि कंत्राटदारांवर एक लाख रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने गेल्या वर्षी जाहीर केला होता. मात्र, या दंडात्मक कारवाईची अंमलबजावणी अद्याप रखडली आहे. महापालिका कायद्यात एक लाख रुपयांच्या दंडाची स्पष्ट तरतूद नसल्याने त्यासाठी राज्य सरकारची मंजुरी आवश्यक आहे. संबंधित कायदेशीर तरतुदींची पूर्तता न झाल्यामुळे हा प्रस्ताव अद्याप अंमलात आलेला नाही. तसेच यासंदर्भातील प्रस्तावही राज्य सरकारकडे अद्याप पाविण्यात आलेला नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

    Chandrapur News: हसता खेळता ग्रुप सेल्फी काढला, मोबाईल काठावर ठेवला अन् घात झाला! वर्धा नदीत 5 मित्रांचा दुर्दैवी मृत्यू; 15 ते 20 वर्षांच्या मुलांच्या जाण्याने हळहळ
    मुंबई, ठाणे, नवी मुंबईकरांना मुख्यमंत्र्यांची मोठी भेट! 28 किमीचा मेट्रो मार्ग अन् गायमुख ते भाईंदर नव्या पुलांना मंजुरी; पाहा संपूर्ण प्लॅन
    Jalgaon Accident: एका डुलकीने सहा जणांचा जीव गेला! कारचालक झोपेत होता, बस चालकाने सांगितला जळगाव अपघाताचा थरार

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed