• Sat. Jun 6th, 2026
    Sachin Ghaywal : भावाच्या मदतीनेच सचिन घायवळ फरार, पोलीस तपासात मोठी माहिती समोर; तुरुंगात भाऊ निलेश घायवळबाबत मोठा खुलासा

    Pune Nilesh Ghaywal Brother Sachin Ghaywal Arrest : ​​त्याच्याविरोधात कोथरूड व दत्तवाडी पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल असून, ‘मकोका’च्या कारवाईनंतर तो फरारी झाला होता.

    सचिन घायवळ राजस्थानातून अटक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म.टा. प्रतिनिधी, पुणे : ‘पोलिसांच्या हाती लागू नको, सतत ठिकाणे बदलत राहा,’ असा सल्ला कुख्यात गँगस्टर नीलेश गायवळ (घायवळ) याने आपल्या मोठ्या भावाला सचिन गायवळ याला दिला होता. त्यानुसार सचिन नऊ महिने पोलिसांना गुंगारा देऊन सोलापूर, जामखेड आणि अखेर राजस्थानमध्ये लपला होता. मात्र, पुणे गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने चार दिवस सापळा रचून राजस्थानातील सिकर जिल्ह्यातील धिंगपूर गावातून त्याला अटक केली.

    गुन्ह्यानंतर तो फरारी

    पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन बन्सीलाल गायवळ (वय ४८, रा. कोथरूड) याच्यावर खंडणीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. वारजे पोलिस ठाण्यातील ४४ लाख रुपयांच्या खंडणी प्रकरणात त्याच्यावर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई केली होती. या गुन्ह्यानंतर तो फरारी झाला होता.
    Maharashtra TimesCrime News : कॉलेज विद्यार्थ्याकडून लाच घेतली, कोड वर्डप्रमाणे आळस दिला, API सह पोलीस कॉन्स्टेबल रंगेहाथ जाळ्यात

    कोठडीत भावाबाबत व्यक्त केली खंत

    पोलिस कोठडीत चौकशीदरम्यान सचिन गायवळ याने फरार भाऊ नीलेश गायवळ याच्याबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. नीलेशच्या गुन्हेगारी कारवायांमुळे संपूर्ण कुटुंबाला त्रास सहन करावा लागत असल्याचे त्याने सांगितले. चौकशीदरम्यान सचिनने पोलिसांना सांगितले की, नीलेशने स्वतःच्या मुलांना परदेशात उच्च शिक्षणासाठी पाठवून त्यांचे भविष्य सुरक्षित केले. मात्र, त्याच्या गुन्हेगारी कृत्यांचा फटका इतर कुटुंबीयांना आणि त्यांच्या मुलांना बसत आहे. या चर्चेमुळे फरारी काळातही सचिन आणि नीलेश यांच्यात संपर्क कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, नीलेश गायवळ याच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.
    Maharashtra TimesMaratha Reservation : अखेर लढ्याला यश आलं! मनोज जरांगे इम्पॅक्ट, मराठा समाजासाठी मोठे निर्णय; वाचा संपूर्ण शासन निर्णय

    कसा अडकला पोलिसांच्या जाळ्यात?

    दरम्यान, कोथरूडमध्ये किरकोळ वादातून तरुणावर गोळीबार करून परदेशात पळून गेलेला कुख्यात आरोपी नीलेश गायवळचा (घायवळ) भाऊ सचिन गायवळ याला पुणे पोलिसांनी बुधवारी रात्री राजस्थानातून अटक केली. याप्रकरणी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मकोका) कारवाई झाल्यानंतर सचिन गायवळ फरारी झाला होता. मागील नऊ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत असलेल्या सचिन गायवळला गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने राजस्थानमधील सिकर जिल्ह्यातील धिंगपूर गावातून जेरबंद केले. पुण्याच्या विशेष न्यायालयाने त्याला नऊ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा