Kirit Somaiya: सोमय्या यांनी मुंबई, नाशिक आणि नंदुरबार येथील दाखल्यांमधील फेरफाराचा दाखला देत प्रशासकीय कारभारावर बोट ठेवले.
नाशिक दौऱ्यावर आलेल्या सोमय्या यांनी गुरुवारी (दि. ४) महापालिकेला भेट दिली. यावेळी सोमय्या यांनी आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडून जन्म-मृत्यू नोंदणी, दाखल्यांचे वितरण, दुरुस्ती प्रक्रिया आणि डिजिटल नोंदींचा आढावा घेतला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
Vidhan Parishad Election: निवडणुकीतून माघार घेण्यासाठी भाजपकडून कोट्यवधी रुपयांच्या ‘ऑफर्स’; हर्षवर्धन सपकाळांचा गौप्यस्फोट
मुंबईत एका वर्षात तब्बल ८७ हजार जन्म दाखल्यांमध्ये दुरुस्त्या करण्यात आल्या. नाशिकमध्ये दीड वर्षात १८ हजार ८३७ दाखल्यांमध्ये बदल झाले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर घोळ सुरू आहे. नाशिकमधील १८,८३७ आणि नंदुरबारमधील १,१०० संशयास्पद दाखल्यांची मूळ कागदपत्रांसह सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली.
केंद्र सरकारने जन्म-मृत्यू नोंदींमध्ये पारदर्शकता आणि एकसमानता आणण्यासाठी ‘सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम’ अनिवार्य केली आहे. मात्र, राज्यातील अनेक महापालिकांनी २०१६ पासून या प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी केली नाही, असा आरोप सोमय्या यांनी केला. ‘सीआरएस’मुळे डिजिटल पडताळणी सोपी होऊन बनावट दाखले आणि अनधिकृत फेरफारांना आळा बसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार, गटनेते ॲड. श्याम बडोदे उपस्थित होते.
Dillip walse Patil यांनी Sharad Pawar यांची भेट घेतली, नेमकं कारण काय?
…तरीही नंदुरबारमध्ये जन्मदाखले
वयाच्या ४० ते ५० वर्षांनंतर लोक नाव, आडनाव, जात बदलण्यासाठी अर्ज करत असल्याचे समोर आले आहे. नंदुरबारमध्ये कोणतेही जुने अधिकृत रेकॉर्ड उपलब्ध नसताना सुमारे १,१०० जन्मदाखले वितरित करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. मूळ नोंदींशिवाय हे दाखले कोणत्या आधारावर दिले, याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
