• Sat. Jun 6th, 2026

    Nashik Accident: मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; ब्रेक फेल झालेल्या क्रेनची 4 वाहनांना धडक, आजोबा- नातवाचा मृत्यू, दोन गंभीर

    Nashik Accident: मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; ब्रेक फेल झालेल्या क्रेनची 4 वाहनांना धडक, आजोबा- नातवाचा मृत्यू, दोन गंभीर

    Mumbai-Agra Highway Accident: मुंबई-आग्रा महामार्गावरील राहुड घाटात चार वाहनांमध्ये झालेल्या विचित्र अपघातात दोन जणांचा मृत्यू, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

    राहुड घाट अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, चांदवड : येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील राहुड घाटात मंगळवारी (दि. २ जून) दुपारच्या सुमारास चार वाहनांमध्ये झालेल्या विचित्र अपघातात दोन जण ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींवर चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी मालेगाव येथे या पाठविण्यात आले आहे. अपघातामुळे राहुड घाटातील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. दरम्यान, मृतांमध्ये मालेगावातील आजोबा व नातवाचा समावेश आहे.

    चांदवडकडून मालेगावकडे जाणाऱ्या हायड्रा क्रेन, अॅपे रिक्षा, पिकअप व आयशर यांच्यात मंगळवारी (दि. २) दुपारी चार वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. राहुड घाटातील तीव्र उतारावर गतिरोधकाजवळ घडलेल्या या विचित्र अपघातात अब्दुल कय्युम अब्दुल रज्जाक (वय ६२) व अब्दुल आहिल अब्दुल रहेमान (वय ११, दोघे रा. मोहनबाबा नगर, मालेगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. तर योगेश अशोक बाविस्कर (वय २७) व बारकू सुभाष वैद्य (वय २३, दोघे रा. खडकी ता. मालेगाव) हे गंभीर जखमी झाले आहेत.

    Maharashtra TimesUddhav Thackeray : विधान परिषदेत माघार, 52 मतदारांची ताकद वाया, ठाकरे गटात असंतोषाची ठिणगी, कदम बैठकीलाच थांबले नाहीत
    अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णवाहिकेने चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून दोघा जखमींना पुढील उपचारासाठी मालेगाव येथे पाठविण्यात आले आहे. या अपघातातील हायड्रा क्रेन घेऊन जाणारा चालक अनुज संजय सिंह (वय २२) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    Maharashtra TimesMaharashtra Onion Export: कांदा निर्यात दुप्पट! महाराष्ट्रात वर्षभरात 10.59 लाख टनांहून अधिकचा टप्पा पार
    घटनेची माहिती मिळाल्यानंतर मृत व जखमींच्या नातलगांनी चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड पोलिस करीत आहेत. दरम्यान, अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा