आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर अनेक कडक निर्बंध लादले होते. यात प्रतिटन ५५० डॉलर्सचे किमान निर्यात मूल्य आणि ४० टक्के प्रचंड निर्यात शुल्क समाविष्ट होते. १३ सप्टेंबर २०२४ रोजी सरकारने ‘एमईपी’ हटवला आणि निर्यात शुल्क ४० टक्क्यांहून २० टक्क्यांपर्यंत कमी केले.
Vidhan Parishad : दोघांनी अर्ज घेतले, पण भरला एकानेही नाही; नाशकात ठाकरेंची माघार, शिंदेंना ‘बाय’ दिल्याची चर्चा
कांदा दरात सुधारणा होणार
नाशिक : नाफेड, एनसीसीएफसह बाजार समित्यांच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी सुरू करा, असे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. राज्यात ही खरेदी सुरू झाली की कांद्याच्या दरात सुधारणा होईल, असा विश्वास शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी नाशिकमध्ये व्यक्त केला. विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवाराचा अर्ज दाखल करण्याकरिता भुसे जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यावेळी ते म्हणाले, राज्यात अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे काही ठिकाणी कांद्याचे दर पडले, ही वस्तुस्थिती आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या आठवड्यात दिल्लीत बैठक झाली. थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी सुरू झाल्यास शेतकऱ्यांना निश्चितपणे चांगला आर्थिक लाभ मिळेल. लाभापासून वंचित लाडक्या बहिणींबाबत ते म्हणाले, यापूर्वी सरकारने ‘ईकेवायसी’ला मुदतवाढही दिली. तरीही ‘ई केवायसी’ करणे राहून गेलेल्या महिलांच्या बाबतीत सरकार वरिष्ठ पातळीवर चर्चा करून निर्णय घेईल.’
Vidhan Parishad Election: महायुतीत शिवसेनेकडून बंडखोरी; विधान परिषदेसाठी समीर सत्तारांचा अपक्ष अर्ज, एकूण 7 जण रिंगणात
महाराष्ट्राचे वर्चस्व आणि नाशिकचा वाटा
भारताच्या एकूण कांदा निर्यातीमध्ये एकट्या महाराष्ट्राचा वाटा तब्बल ६८ टक्के इतका प्रचंड आहे. राज्यांतर्गत विचार केल्यास नाशिक जिल्हा हा निर्यातीचा मुख्य केंद्र राहिला आहे. महाराष्ट्राच्या एकूण निर्यातीमध्ये नाशिकचा वाटा अंदाजे ८० ते ९० टक्के आहे.
‘अपेडा’कडे उपलब्ध आकडेवारीनुसार
-आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये महाराष्ट्राने कांदा निर्यातीतून २,४०६ कोटी रुपयांचे परकीय चलन कमावले आहे. जे गेल्या वर्षी १,७४२ कोटी रुपये होते.
-राष्ट्रीय पातळीवर एकूण १५.४७ लाख टन कांदा निर्यात झाला. गेल्या वर्षी हा आकडा ११.४७ लाख टन होता.
-देशाची एकूण महसुली कमाई ३,५१५ कोटी रुपये झाली.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघातात दोघांचा करुण अंत; खंडाळा घाटातील घटना, तिघे गंभीर जखमी
बांगलादेशचा वाटा घटला
पारंपरिकदृष्ट्या भारतीय कांद्याचा सर्वात मोठा खरेदीदार असलेल्या बांगलादेशचा वाटा कमालीचा घटला आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये बांगलादेशचा वाटा ४२ टक्के होता, तो २०२५-२६ मध्ये थेट सहा टक्क्यांवर आला. याची कसर भरून काढण्यासाठी भारतीय निर्यातदारांनी श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती (दुबई), मलेशिया, सिंगापूर, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि आखाती देशांमध्ये आपल्या बाजारपेठा यशस्वीरीत्या विस्तारल्या आहेत.
देशातील प्रमुख कांदा निर्यातदार राज्ये
महाराष्ट्र -१०.६ लाख टन
तमिळनाडू -२.३ लाख टन
उत्तर प्रदेश -१.१ लाख टन
पश्चिम बंगाल -१.० लाख टन
