Mrinal Tai Gore Flyover: या पुलासाठी 248 कोटी रुपयांचा खर्च झाला असून यामुळे 30 मिनिटांचा प्रवास 5 मिनिटांत होणार आहे. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडपर्यंत सिगन्नल-मुक्त कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: गोरेगाव पश्चिमेकडील मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्ताराच्या कामाला गती दिली जात आहे. राम मंदिर रोड ते रिलीफ रोडपर्यंत एस. व्ही. रोडलगतच्या या विस्तारित मार्गाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले असून ३१ मेपर्यंत कामे पूर्ण करण्याचे मुंबई महापालिकेचे नियोजन आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा विस्तारित मार्ग वाहनचालकांसाठी खुला होईल. त्यामुळे या परिसरातील प्रवास वाहतूककोंडीमुक्त होणार आहे.
२०१९पासून बांधकाम सुरू
मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्यातील काम २०१६ मध्ये पूर्ण झाले. या पुलामुळे एस. व्ही. रोडवरून पश्चिम द्रुतगती महामार्गावर पोहोचणे सोपे झाले. या पुलाच्या बांधकामासाठी २५५ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. या पुलाच्या बांधकामानंतर राम मंदिर रोड ते रिलीफ रोडपर्यंत एस. व्ही. रोडलगत पुलाच्या विस्ताराच्या कामाला प्रत्यक्षात मार्च २०१९पासून सुरुवात झाली. ७५० मीटर लांबीच्या या विस्तारित पुलाच्या बांधकामामध्ये जागेची अडचण लक्षात घेता, तसेच जलद बांधकाम करण्यासाठी या उड्डाणपुलाचे ‘सुपर स्ट्रक्चर’ स्टीलने बांधण्यासाठी डिझाइन केले आहे.
SCLR Final Phase: डबल डेकर ब्रिज, 90 अंशाचा पूल; ‘सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड’मुळे 12 वर्ष फायदा, आता अंतिम टप्पा सुरू होणार
सुरुवातीला या प्रकल्पाचा कंत्राट खर्च सुमारे २०९ कोटी रुपये होता. करोनामुळे काम थांबले आणि पुढे २०२३ मध्ये खर्चवाढीचा प्रस्ताव सादर करून विविध करांसह याचा खर्च २४० कोटी रुपये एवढा करण्यास मान्यता देण्यात आली. आता याच प्रकल्पाची किंमत २४८ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
उपमहापौर संजय घाडी यांनी शुक्रवारी या पुलाच्या कामाची पाहणी केली आणि महापालिका अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. सध्या पुलाच्या विस्ताराचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून विविध पूरक कामांना वेग देण्यात आला आहे. रस्त्याचे पुनर्पृष्ठीकरण, दिशादर्शक फलक उभारणे, दिवाबत्ती व्यवस्था, गतिरोधक बसविणे, रस्त्यावर पांढरे व पिवळे पट्टे आखणे आणि पुलाच्या कठड्यांचे रंगकाम आदी कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. पुलाच्या दोन्ही बाजूंना निवासी इमारती व वसाहती असल्यामुळे नागरिकांना ध्वनिप्रदूषणाचा त्रास होऊ नये, यासाठी दोन्ही बाजूंना ध्वनिरोधक उभारण्यात आले आहेत. पुलाची ‘लोड टेस्ट’ पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी उर्वरित सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत आणि उड्डाणपूल तातडीने वाहतुकीसाठी खुला करावा, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्याचे उपमहापौर घाडी यांनी सांगितले.
ओशिवरा प्रसूतिगृहासह ओशिवरा स्मशानभूमीच्या कामाचाही उपमहापौर घाडी यांनी आढावा घेतला. १५२ रुग्णशय्या क्षमतेच्या ओशिवरा प्रसूतिगृह (मॅटर्निटी होम) इमारतीचा विकास प्रकल्प वेगाने सुरू असून अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सज्ज आरोग्यसेवा केंद्र उभारण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये शस्त्रक्रिया विभाग, नवजात बालक अतिदक्षता विभाग (एनआयसीयू), लहान मुलांसाठी एमआयसीयू, डायलिसिस विभाग, सिटी स्कॅन सुविधा, तसेच डॉक्टर व परिचारिकांसाठी निवासी व्यवस्था आदी महत्त्वपूर्ण कामांचा समावेश आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा