• Sat. Jun 6th, 2026
    Harshwardhan Sapkal: गृह खाते ‘पांडू हवालदार’ चालवतो! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

    Harshwardhan Sapkal: गुजरातमधून महाराष्ट्रात येणारे ड्रग्ज, जामतारासारखे प्रकरण व अवैध धंद्याचे रॅकेट राजरोस सुरू असून, त्याला गृह विभागाचा आशीर्वाद आहे,’ असे टीकास्त्र सपकाळ यांनी सोडले.

    harshwardhan sapkal.(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : राज्यातील कायदा व सुव्यवस्था रसातळाला गेली असून, खालपासून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत हप्ते पोहचवले जात आहेत. पोलिसांवर कोणाचाही वचक राहिलेला नाही. म्हणूनच राज्यात ड्रग्जचा खुलेआम काळाधंदा सुरू आहे. हातभट्ट्या व विषारी दारूने थैमान घातले आहे.

    राज्याचा गृह विभाग ‘पांडू हवालदार’ चालवत असल्यामुळेच सगळीकडे बेबंदशाही माजली आहे,’ अशी टीका करून ‘देवेंद्र फडणवीस यांनी याचे प्रायश्चित घेऊन राज्याला पूर्ण वेळ सक्षम गृहमंत्री द्यावा,’ अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ‘पुण्यात विषारी दारूने २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारला जाग आली असून, हातभट्ट्या तोडण्याची कारवाई केली जात आहे. या हातभट्ट्या एका रात्रीत उभ्या राहिलेल्या नाहीत. राज्यातील अनेक शहरांत व खेड्यांत अवैध धंदे व हातभट्ट्या राजरोस सुरू आहेत.
    Maharashtra TimesTukaram Mundhe: विषारी दारुमुळे पुण्यात मृत्यूंची मालिका; तुकाराम मुंढेंनी भेसळीची पाळेमुळे खणून काढली, भिवंडीत मोठी कारवाई!
    ‘आरक्षणासाठी जातगणना करावी’
    ‘मराठा आंदोलनावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत मध्यरात्री मराठा आरक्षण दिल्याचे जाहीर केले व गुलाल उधळला होता. त्यानंतर आझाद मैदानातील आंदोलनावेळीही गुलाल उधळला. त्या वेळी मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस होते. या दोन्ही आंदोलनांवेळी मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिले होते ते जाहीर करावे. आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल, तर जातनिहाय जनगणना करावी. त्यातूनच मराठा समाजासह सर्वच समाजांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो,’ असेही सपकाळ म्हणाले.

    Maharashtra TimesVidhan Parishad Election: ‘मविआ’चे १५ जागांवर एकमत; दोन जागांचा निर्णय लवकरच, हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती
    ‘गुन्हेगारीत पुणे देशात पाचवे’
    गुन्हेगारीच्या बाबतीत पुणे राज्यात पहिल्या आणि देशात पाचव्या क्रमांकावर आल्याने पुणे गुन्हेगारीची राजधानी बनले आहे. याला ‘पुण्याचे शिल्पकार’च जबाबदार आहेत,’ अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी केली. विषारी दारूकांडातील मृत्यूंची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. हे आकडे लपवले जात असल्याचा संशय व्यक्त करीत पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची मागणी त्यांनी केली.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा