• Sat. Sep 5th, 2026

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची भागवत कथा महायज्ञाला भेट – महासंवाद

ByMH LIVE NEWS

May 29, 2026
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची भागवत कथा महायज्ञाला भेट – महासंवाद

मुंबई, दि. २९: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी पुरुषोत्तम मासानिमित्त जोगेश्वरी मुंबई येथे सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथा महायज्ञाला भेट देऊन उपस्थित भाविक श्रोत्यांशी संवाद साधला.

श्रीमद् भागवत ही चारित्र्य संपन्न समाज घडविणारी कथा असून त्यातून आदर्श जीवन जगण्याचे मार्गदर्शन होते, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

यावेळी राज्यपालांनी कथाकर्ता महावीर शरण शास्त्री यांचा सत्कार केला तसेच श्रीमद्भागवत महायज्ञ आयोजक सावरकर फाउंडेशनचे अभिनंदन केले. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष व नगरसेवक रुपेश सावरकर उपस्थित होते.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed